मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण

Launch of the Online System for the CM Medical Assistance Fund Cell

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरीता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. त्यासोबत राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे.  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी त्यांनी या   कक्षाच्या कामकाजाचा आढावा व कक्षाकरीता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन तसेच राज्यामध्ये कार्यरत आरोग्यविषयक योजनांचे एकत्रिकरण करण्यात येऊन वॉर रूम स्थापन करण्या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाव्दारे नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली. (Launch of the Online System for the CM Medical Assistance Fund Cell)

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी इम्युनो थेरेपी अतिशय खर्चिक असते. तिचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. या थेरेपीचे एक इंजेक्शन साधारणतः दोन लाख रुपयांच्या घरात असून, उपचाराचा एकूण खर्च जवळपास आठ लाख रुपये असतो. या उपचार पद्धतीचा लाभ राज्यातील गरजू रुग्णांना देण्यासाठी नियोजन करावे .आरोग्य योजनेचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे, परंतु दुहेरी लाभ टाळल्यास त्याचा लाभ खऱ्या गरजुना जास्त प्रमाणात देता येईल. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. याद्वारे खऱ्या गरजुना मदत करता येईल, त्याचप्रमाणे दुहेरी लाभ देण्याचे प्रकारही टाळता येतील. (Launch of the Online System for the CM Medical Assistance Fund Cell)

नवीन वेबसाईटचे वैशिष्टे

* रुग्णांना अर्जाची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएस, लिंकद्वारे रिअल टाईम मिळते.

* अर्जाच्या मंजुरीनंतर ३० टक्के रक्कम तात्काळ, उर्वरीत ७० टक्के रक्कम अंतिम मंजुरीनंतर वर्ग केली जाणार.

* मंत्रालय स्तरावर वॉर रूम द्वारे सतत देखरेख, निर्णय प्रक्रियेत गती.

* उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ कार्यालयीन ८ तासांत दिली जाते.

* कागदपत्रांची देवाणघेवाण किंवा कार्यालयीन धावपळ शिवाय डिजिटल पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण.

* :रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही रुग्णालयातूनच अर्ज सादर.

* आधार, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका इ. तात्काळ डिजिटल पडताळणी.

* मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा पारदर्शकता वाढते.

 *  राज्यातील सरकारी व खाजगी मिळून ३,०००+ रुग्णालयांचा समावेश.

* टोल-फ्री १८०० १२३ २२११ व वाट्अँप द्वारे मार्गदर्शन सुविधा.

*  जवळील योजनेमधील रुग्णालय, रक्तपेढी, रुग्णवाहिका सहज शोधण्याची सुविधा.

 एनजीओ व सीएसआर भागीदारी मॉडेल : स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट सीएसआर निधीद्वारे अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध.

* त्रिपक्षीय करार प्रणाली : रुग्णालय + सीएसआर संस्था + सीएमआरएफ यांच्यात विशिष्ट आजारासाठी करार खर्चाचा संयुक्त भार.

 * बेड मॅनेजमेंट व संसाधन पारदर्शकता : धर्मादाय रुग्णालयांतील बेड उपलब्धता रिअल-टाइम पाहण्याची सुविधा.

————–

रुग्णांना तात्काळ, सुलभ मार्गदर्शन मिळावे यासाठी “रुग्ण मित्र” ही २४x७ टोल-फ्री हेल्पलाईन (१८०० १२३ २२११) सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे रुग्णांना डिजिटल लिंक मिळते, ज्यातून त्यांच्या परिसरातील मान्यताप्राप्त रुग्णालये, रुग्णवाहिका सेवा आणि रक्तपेढ्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे. (Launch of the Online System for the CM Medical Assistance Fund Cell)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या