Laser attack in Red Sea: जर्मनीच्या विमानावर चीनचा लेसर हल्ला

Laser attack in Red Sea

बर्लिन : लाल समुद्रात पाळत ठेवणाऱ्या एका जर्मन विमानावर एका चिनी लष्करी जहाजाने लेसरने हल्ला केला. या प्रकारानंतर जर्मनीने चीनकडे मंगळवारी (८ जुलै) तीव्र आक्षेप नोंदवला. बर्लिनमधील चिनी राजदूताला बोलावून या घटनेसंदर्भात जर्मनीने तीव्र नापसंती व्यक्त केली. (Laser attack in Red Sea)

जर्मन परराष्ट्र कार्यालयाने या कृत्याला पूर्णपणे अस्वीकार्य म्हटले आहे. तसेच चिनी युद्धनौकेवरील कर्मचारी आणि ऑपरेशनल सुरक्षितता दोन्ही धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे. या घटनेने आधीच अस्थिर असलेल्या सागरी क्षेत्रावरील तणाव आणखी गडद झाला आहे.

दरम्यान, लेसर घटनेनंतर पाळत ठेवणाऱ्या विमानाने मोहीम रद्द केली.(Laser attack in Red Sea)

जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला या भागात वारंवार आढळणाऱ्या एका चिनी युद्धनौकेने लेसर हल्ला केल्याचे वृत्त आहे. ज्या विमानाला लक्ष्य करण्यात आले ते एका नागरी व्यावसायिक पुरवठादाराने चालवले होते. यामध्ये जर्मन सैन्याचे कर्मचारी होते. मंत्रालयाने स्पष्ट केले की लेसर लक्ष्यीकरणासाठी कोणताही पूर्व संपर्क किंवा कारण देण्यात आलेले नाही.

हे विमान युरोपीयन युनियनच्या नेतृत्वाखालील एस्पाइड्स (ASPIDES) मोहिमेतील आहे. ते येमेनच्या हुथी बंडखोरांमुळे धोक्यात असलेल्या आणि उच्च-जोखीम असलेल्या सागरी मार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी जहाजांचे संरक्षण करते.(Laser attack in Red Sea)

‘‘लेसरचा वापर करून, युद्धनौकेने कर्मचारी आणि नौकेवरील साहित्य धोक्यात आणले,’’ असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, असे ‘एपी’ने म्हटले आहे.

या घटनेनंतर खबरदारी म्हणून विमानाने मोहीम रद्द केली आणि जिबूती येथील तळावर ते सुरक्षितपणे उतरवले.

सुदैवाने, क्रूला कोणतीही हानी झाली नाही आणि त्यानंतर विमानाने ईयू मोहिमेअंतर्गत पुन्हा काम सुरू केले आहे.

लढाई नाही; तर नागरी संरक्षण

युरोपीयन संघा (ईयू)च्या सामान्य सुरक्षा आणि संरक्षण धोरणांतर्गत एस्पाइड्स मिशन केवळ लाल समुद्र, एडनचे आखात आणि हिंद महासागरातून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक आणि व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यावर केंद्रित करते. ते कोणत्याही आक्रमक किंवा लष्करी हल्ल्यांमध्ये भाग घेत नाही.

हेही वाचा :
डिजिटल अरेस्ट प्रकरणात पुण्यातील भामट्यांची टोळी उघडकीस

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?