मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस आणि राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. विरोधकांनी त्यांच्यासह भारतीय जनता पक्षावरही टिकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी दुबे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. (CM clarifies on Dubey)
निशिकांत दुबे यांचे वक्तव्य हे मराठी माणसांना उद्देशून नव्हते तर ते एका संघटनेच्या संदर्भात होते, असे फडणवीस म्हणाले. मात्र, तरीही अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस दुबे यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, “खासदार निशिकांत दुबे यांचे वक्तव्य एका संघटनेच्या संदर्भात होते. तुम्ही त्यांचे वक्तव्य नीट आणि पूर्णपणे ऐकले तर ते लक्षात येईल. त्यांचे वक्तव्य मराठी माणसांबाबत सरसकट नाही. मात्र, तरीही अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य योग्य नाही. कारण त्यांच्या वक्तव्याचे अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे ठरतात. मराठी माणसांचे योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो.” (CM clarifies on Dubey)
खासदार दुबे काय म्हणाले होते?
तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले होते. ठाकरे बंधूंचे नाव न घेता दुबे यांनी हे वक्तव्य केले. (CM clarifies on Dubey)
दुबे यांनी कुणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर देत हे वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला.
दुबे म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणताय की लोकांनी मराठी बोलले पाहिजे. तुम्ही कोणाची भाकरी खाताय? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. टाटांनी येथे (बिहारमध्ये) आपला पहिला कारखाना स्थापन केला. तुम्ही लोक आमच्या पैशावर जगताहात, हे लक्षात घ्या.’’ (CM clarifies on Dubey)
राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना दुबे यांनी, त्यांनी उर्दू, तमिळ किंवा तेलगू बोलणाऱ्यांनाही मारहाण करावी, असे आव्हान दिले.
हेही वाचा :
कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही : अशिष शेलार
मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड