Landslide on Vaishno Devi road : वैष्णोदवी मार्गावर भूस्खलन, पाच जणांचा मृत्यू

Landslide on Vaishno Devi road

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीर राज्यात दोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगफुटी झाल्याने वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भुस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये अनेकजण गाडले असल्याची शक्यता आहे. प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले असून पोलिस आणि एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. (Landslide on Vaishno Devi road)

दोडा जिल्ह्यात कटरा येथे मुसळधार पावसामुळे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अर्धकुंवारी येथे असलेल्या इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या १२ किमी वळणाच्या मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. भूस्खलनामुळे घर कोसळून दोघांचा तर पुरामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १४ जण जखमी आहेत. तसेच भूस्खलनामुळे या भागातील अनेक घरे आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी काही जण गाडले जाण्याची भीती आहे. याशिवाय प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या रहिवाशांना तिथून दूर जाण्याचे आवाहन केले आहे. (Landslide on Vaishno Devi road)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमकोटी ट्रेक मार्गावरील भाविकांचा प्रवास सकाळपासून थांबवण्यात आला होता. तर दुपारी दीड वाजेपर्यंत जुन्या मार्गावरून भाविकांचा  प्रवास सुरू होता. परंतु मुसळधार पावसामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही जुन्या मार्गावरूनही भाविकांचा प्रवास थांबवला आहे. त्यामुळे आता भूस्खलनामुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोड आणि बॅटरी चष्मा येथे टेकड्यांवरून दगड कोसळल्यानंतर आज सकाळी खबरदारीचा उपाय म्हणून २५० किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भारताला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या एकमेव सर्व हवामान महामार्गावरील वाहनांची वाहतूक जम्मूमधील उधमपूर आणि काश्मीरमधील काझीगुंड येथे थांबवण्यात आली आहे. लष्कर गादीगड परिसरातून लोकांना सतत वाचवत आहे. (Landslide on Vaishno Devi road)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर