Sapkal’s criticism of the work of the Election Commission : राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार  : हर्षवर्धन सपकाळ

Sapkal's criticism of the work of the Election Commission

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे.  कोर्टाने त्याबाबत २२ नोव्हेंबरला निर्णय दिला असताना आठ दिवस राज्य  निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून  निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, अशी टीका  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केली.

३ तारखेचा निकाल २० तारखेला जाहीर करा

ते  म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षानंतर होत आहेत. मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली.  मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करून दुबार,तिबार नावे मतदार यादीत दाखवली.  निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे आणि आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे तीन तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा अशी मागणी सकपाळ यांनी केली.  आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे  आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (Sapkal’s criticism of the work of the Election Commission)

सोनीया, राहूल गांधीवर राजकीय सुडबुद्धीतून गुन्हा दाखल

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार राजकीय सुडबुद्धीतून केलेला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेता गैरवापर करत आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार व कपोलकल्पित आहे. यामध्ये अनेक चौकशा करण्यात आल्या पण काहीही ठोस नाही. केवळ गांधी कुटुंबाला बदनाम करणे त्यांचा नाहक त्रास देणे यासाठी मोदी शाह सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करत आहेत. गांधी कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान आहे, त्याग व बलिदानाची परंपरा आहे. मोदी शाह यांच्या दडपशाहीविरोधात लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम राहुलजी करत असल्याने अशी कारवाई केली जात आहे. काँग्रेस अशा कारवायांना भीक घालत नाही. मोदी शाह यांच्या सुडाच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो, असे काँग्रेस  सपकाळ यांनी सांगितले.

मोहोळ, पार्थ पवारांवर गुन्हे दाखल का नाहीत?

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा सवालही त्यांनी केला . (Sapkal’s criticism of the work of the Election Commission)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर