महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर मोतीबाग तालमीचे नवे वस्ताद

Joshilkar Motibag Talmi's new creation

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मोतीबाग तालमीच्या वस्ताद पदी तालमीचे जेष्ठ मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांची एकमताने निवड करणेत आली. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देण्यासाठी राजघराण्याची खास असलेल्या बागेवर मोतीबाग तालमीची उभारणी केली होती. या तालमीने देशाला अशियाई, राष्ट्रकुल पदक विजेत्या मल्लासह मातीच्या कुस्तीतील गदा पटकावणारे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल दिले आहे. राज्यातील नामांकित तालमीचे वस्ताद पदाची धुरा जोशीलकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)

   करवीर नगरीतील कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य  बाळ दादा गायकवाड यांचे  पुतणे प्रदिप गायकवाड यांनी पुढाकार घेवून मेळावा घेणेबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडे परवानगी मागितली होती.  तालीम संघाच्या परवानगीनंतर मेळावा घेण्यात आला. कुस्ती क्षेत्रातील मरगळ दूर करणेसाठी व उर्जीत अवस्था आणणे कामी तालमीत नविन वस्ताद नेमणे व बुरुजबंद मल्ल घडवणे अशा सुचना सादर केल्या त्यास एकमताने मंजूरी दिली नविन वस्तादानी मोतीबाग तालीम व स्वागीय बाळ दादा गायकवाड यांचा वसा व वारसा पुढे शिस्तबद्द चालवावा असे मनोगत ज्येष्ठ मल्लांनी केले. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)

तालीम संघाचे कार्याध्यक्ष संभाजी वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अशोक माने यांनी वस्ताद पदी विष्णू जोशिलकर यांचे नाव सुचवले.  त्याला माणिक मंडलिक आणि आर. के. पोवार यानी अनुमोदन दिल्याने एकमताने निवड करणेत आली. पुर्वीची मोतीबाग तालमीची व्यवस्थापन समिती कायम ठेवणेत आली. ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले बद्दल पै गौरव गुंडाजी पाटील यांचा सत्कार करणेत आला

यावेळी तालीम संघाचे सरचिटणीस अशोक पोवार, बी.एच.पाटील, बाजीराव कळत्रे, विजय सरदार, सुखदेव एरूडकर, प्रदिप गायकवाड, बाळासो मेटकर, आर.के.पोवार, संभाजी पाटील, माणिक मंडलिक यांनी तालीम संघ व मोतीबाग तालमीस उर्जीत अवस्था आणण्यासाठी सूचना केली.

  यावेळी प्रकाश खोत, हिंदकेसरी विनोद चौगले, चंद्रकांत चव्हाण, निलेश देसाई, बाजीराव पाटील, सर्जेराव राऊ पाटील, जयकुमार शिंदे , बापू लोखंडे , संतोष कामते, सरदार वरुटे, विलास पाटील, शिवाजी कवठेकर, विक्रम माने, आनंदा खराडे, विजय पाटील, ज्युनिअर दादू चौगले, महेश नलवडे, रणजित पाटील आदी उपस्थित होते. आभार बटू जाधव यांनी मानले. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय