नवी दिल्ली : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे नातेवाईकही होते. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागली होती. (JeM terrorist’s list)
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांना लक्ष्य करून उद्ध्वस्त केले. यामध्ये पाच दहशतवादी ठार करण्यात आले. त्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरचे मेहुणे हाफिज मुहम्मद जमील आणि मोहम्मद युसूफ अझहर या दोघांचा समावेश आहे.
क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेले हे हल्ले ‘‘काळजीपूर्वक वॉरहेड्स निवडली जातात अशा विशिष्ट तंत्रज्ञानाची शस्त्रा’ने करण्यात आले होते. दोन आठवड्यांपूर्वी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने हा हल्ला केला होता. (JeM terrorist’s list)
६-७ मे च्या मध्यंतरी रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पोकमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ९ दहशतवादी लाँच पॅडना लक्ष्य करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारने १०० दहशतवादी मारल्याची पुष्टी केली. या संदर्भात मारल्या गेलेल्या अनेक दहशतवाद्यांची नावेही जाहीर करण्यात आली. या यादीत लष्करचा टॉप कमांडर अबू जिंदाल, मसूद अझहरचा मेहुणा मोहम्मद जमील आणि इतर अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक शीर्ष दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या सर्व दहशतवाद्यांनी याआधी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.
- ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेले दहशतवादी
- मुदस्सर खादियान खास उर्फ अबू जिंदाल (लष्कर-ए-तैयबा)
मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रमुख आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी कमांडर. शासकीय शाळेच्या आवारात त्याच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली. यावरून पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्यातील खोलवर संबंध लक्षात येतात. (JeM terrorist’s list)
- हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद)
हा मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा. बहावलपूर येथील मरकज ‘सुभान अल्लाह’चा प्रमुख. ‘जैश’मधील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात त्याची प्रमुख भूमिका होती.
- मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी (जैश-ए-मोहम्मद)
हा मसूद अझहरचा आणखी एक मेहुणा. जैशच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरांचा तो प्रमुख होता. १९९९ च्या आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणातही तो ‘वॉण्टेड’ होता.
- खालिद उर्फ अबू अकाशा (लष्कर-ए-तैयबा)
जम्मू आणि काश्मीरमधील अनेक हल्ल्यांत सहभाग. अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे मोठे नेटवर्क चालवत असे. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि उपायुक्तही उपस्थित होते.
- मोहम्मद हसन खान (जैश-ए-मोहम्मद)
तो मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा मुलगा होता. पीओकेमध्ये जैशचा ऑपरेशनल कमांडर.
हेही वाचा :
पाकिस्तानच्या हल्ल्यात अतिरिक्त उपायुक्त ठार
दिल्ली विमानतळावरील १३८ उड्डाणे रद्द