विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूला न्याय देतील : जयंत पाटील

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही मागील अडीच वर्ष तुम्ही विधानसभा अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. तुम्ही संख्याबळावर लक्ष न देता दोन्ही बाजूला न्याय दिला. तो पुढेही कराल ही अपेक्षा व्यक्त करत आपले अभिनंदन करतो. (Jayant Patil)

पुढे जयंत पाटील म्हणाले की, मी नार्वेकर यांना सल्ला होता की, पुन्हा सरकार आले, तर मंत्री व्हा. तुमची इच्छा नाही, परंतु, तुमच्या पक्षाचा निर्णय आहे. न्यायदान करताना तुम्ही संयमी काम केले. तुम्ही असा निकाल दिला की, सुप्रीम कोर्टाला निर्णय देता आला नाही. तुम्ही कुणालाच बाद केले नाही, त्याबद्दल आभार. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षफुटीच्या प्रकरणावर पाटील म्हणाले की, तुम्ही निकाल दिला आता तोच निकाल मान्य करावे लागेल.

शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज चालवाल : जयंत पाटील

आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन हे सरकार चालेल ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते. २०१९ ते आले नाही पण आता ते पुन्हा आले आहेत. त्यांनी स्वतःमध्ये काही बदल केले ते आज जाणवले. विरोधी पक्षाबरोबर त्यांनी संवाद साधण्याची तयारी दाखवली. पुढील पाच वर्षे आपण शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज चालवाल अशा शुभेच्छा जयंत पाटील यांनी दिल्या. (Jayant Patil)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ