चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी : जयंत पाटील 

Jayant Patil criticizes the school nutrition meal scheme

जमीर काझी : मुंबई :   संपूर्ण राज्यात चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत अनेक वर्ष तक्रारी येत आहेत. या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना कोण पाठीशी घालत आहे? अन्न व औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कामगिरी सुरू आहे, त्यांनी शालेय पोषण आहाराच्या दर्जातही लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे. (Jayant Patil criticizes the school nutrition meal scheme)

महायुतीची सत्ता आहे तिथेही शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी

सावंतवाडी पंचायत समिती झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट करीत याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यात ते म्हणाले की, शालेय पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याचा आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोप फक्त विरोधक करीत नाहीत तर जिथे महायुतीची सत्ता आहे तिथे देखील अशाच तक्रारी येत आहेत. (Jayant Patil criticizes the school nutrition meal scheme)

पांढरा वाटाणा पुरवून २५०० कोटींचा घोटाळा

नुकतेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने मुलांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार मिळत असल्याचा व्हिडिओ बनवला होता. तसेच मागील वर्षी विधानसभेत आमचे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी देखील शालेय पोषण आहार योजनेत हिरव्या वाटण्याच्या पुरवठ्याऐवजी पांढरा वाटाणा पुरवून तब्बल १८०० ते २५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणले. मात्र शासनाने अद्याप त्यावर काहीच केले नाही. फक्त चौकशी समितीला मुदतवाढची ‘तारीख पे तारीख ‘देत आहेत असे ते म्हणाले. तसेच कोण आहेत हे कंत्राटदार?  जे स्वतःच्या फायद्यासाठी लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत? त्यांच्यावर का कारवाई होत नाही? यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (Jayant Patil criticizes the school nutrition meal scheme)

Related posts

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

कोल्हापूरची शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसित करणार : मधुरिमाराजे

गोव्यात नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास