मराठी व्याकरणाच्या अभ्यासक यास्मिन शेख यांचे १०१ व्या वर्षी निधन

Dr. Yasmin Shaikh has passed away

मुंबई : प्रतिनिधी : मराठी भाषा आणि व्याकरणाच्या गाढ्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ वर्षी निधन झाले. त्या जन्माने ज्यू होत्या. मराठी व्याकरणातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. यास्मिन शेख यांचे ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे पुस्तक व्याकरणातील अधिकृत मानले जाते. (Dr. Yasmin Shaikh has passed away)

श्री.म.माटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण

डॉ. यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी अविरत काम केले. त्या मुळच्या ज्यू होत्या. जेरुशा रुबेन हे त्यांचे मूळ नाव. बेनेइस्त्रायली ज्यू अशी त्यांची ओळख होती. त्यांचे वडील जॉन रुबेन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांची नोकरी फिरतीची असल्याने त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावी झाले. पुण्याच्या स.प.महाविद्यालयातून मराठा भाषा आणि साहित्य या विषयातून पदवी घेतली. श्री.म.माटे हे त्यांचे शिक्षक होते. माटे सरांच्या उत्तम मराठी शिकवण्याच्या आणि त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे यास्मिन या मराठी भाषा आणि मराठी व्याकरणाच्या प्रेमात पडल्या. आणि हे अखेरपर्यंत तेच त्यांचे कार्यक्षेत्र बनले. (Dr. Yasmin Shaikh has passed away)

मराठी व्याकरणातील दोन पुस्तके प्रसिद्ध

त्यांनी औरंगाबादमधील मिलिंद कॉलेज आणि मुंबईच्या सायनच्या ए.आय.इ’एस. महाविद्यालयात अद्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी काही वर्षे स्पर्धा परीक्षेच्या मुलांना भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवले. मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठा शब्दलेखनकोश ही मराठी व्याकरणातील पुस्तके त्यांनी लिहिली. यास्मिन शेख यांनी प्रमाण भाषेचा आग्रह धरला होता.

जन्माने ज्यू, विवाह मुस्लीम व्यक्तीबरोबर

जन्माने ज्यू असलेल्या यास्मिन यांनी अझीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी १९५० मध्ये विवाह केला होता पण त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नव्हता. कारण त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. निवृत्तीनंतर त्या पुण्यातील औंध येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यांना शमा आणि रुकसाना या दोन मुली असून त्यांचेही शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले होते. (Dr. Yasmin Shaikh has passed away)

Related posts

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

कोल्हापूरची शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसित करणार : मधुरिमाराजे

गोव्यात नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास