Jayant patil back ajit pawar: अजित पवारांना दोषी धरणे अयोग्य

Jayant patil back ajit pawar

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात उशीर झाला, यामागे पॉलिटिकल नेक्सस असण्याची शक्यता आहे, तथापि, यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी धरणे योग्य नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रीया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Jayant patil back ajit pawar)

राजकारणी लोकांचे संबंध अनेक लोकांशी असू शकतात, अनेकांबरोबर फोटो असतात, पण राजकारणी किंवा पदाधिकारी असं सांगत नाही की, त्यांच्या घरातील व्यक्तीबरोबर असे वागा आणि असे वागू नका, असे कुणी सांगत नाही. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांना दोष देणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.

आमदार पाटील म्हणाले की, “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोपींना पकडण्यात उशीर होण्यामागे पॉलिटिकल नेक्सस असण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांना कुठलीही मदत व्हायला नको, इतकी माफक अपेक्षा आहे. पीडितेच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून? याची सखोल चौकशी झाली पाहिजे.” (Jayant patil back ajit pawar)

पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हदरवून सोडले आहे. वैष्णवी यांच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार वैष्णवी यांना लग्नानंतर सासरच्या लोकांकडून शारीरिक त्रास होत होता. हुंड्याच्या मागणीसाठी त्यांना सातत्याने मारहाण होत होती.

वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हागवणे फरार होते. मात्र, शुक्रवारी (२३ मे) पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला स्वारगेटमधून अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून ते फरार होते. राजेंद्र हगवणे कुटुंबीय राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे राज्यात हे प्रकरण चांगलेच तापले होते. (Jayant patil back ajit pawar)

मोठ्या सुनेलाही सासरे-दिराकडून शिवीगाळ

दरम्यान, हगवणे कुटुंबीयांची मोठी सून मयुरी जगताप हिने तिच्यावरील अन्यायाविरोधात राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले होते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिच्या भावाने मयुरीवर होत असलेल्या अन्यायाबाबत पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. याबाबत शुक्रवारी (२३ मे) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही माहिती दिली. यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी एक पत्रही जोडले आहे. महिला आयोगाला पाठवलेले हेच ते पत्र असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

हेही वाचा :
हगवणे पिता पुत्रांना अटक
हगवणे प्रकरणात मला का दोषी धरता?
वैष्णवी प्रकरणात सुळे यांनी केली भूमिका जाहीर

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर