मुंबई : प्रतिनिधी : आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. त्यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली. आझाद मैदानात पाच हजार मराठा आंदोलकांची मर्यादी ओलांडली असून मैदान तुडुंब भरले आहे. मोठ्या संख्येने जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समर्थकांच्या उपस्थितीने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मुंबईकरांना त्रास न होता शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन जरांगे यांनी केली. (Jarange’s hunger strike begins)
मराराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास वाशी टोल नाक्यावर पोहोचले आहेत. लढेंगे जितेंगे… एक मराठा, लाख मराठा… अशा घोषणांनी आज सकाळी नवी मुंबई दणाणली. हम सब जरांगे म्हणत मराठा आंदोलकांनी मुंबईत प्रवेश केला. . (Jarange’s hunger strike begins)
मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. मराठा आंदोलकांना पाच हजार आंदोलकांचीच परवानगी मैदानात देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत आंदोलनाची परवानगी आहे. मुंबईत जरांगे दाखल होण्यापूर्वी हजारो समर्थक आझाद मैदानावर पोचले होते. मैदान ओले असूनही आंदोलकांनी मैदानावर ठिय्या मारला. आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसटी परिसरातील वाहतुकीची कोंडी झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक रेल्वे, एसटीसह मिळेल त्या वाहनाने मुंबईत दाखल झाले आहेत.
जरांगेंना आमदार उत्तम जानकर, बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, सरोज अहिरे, अभिजीत पाटील, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, राजेश विटेकर, राजू नवघरे, रोहित पवार या आमदारांनी पाठिंबा दिला आहे.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जरांगेंनी उपोषणास सुरुवात केली. मैदानावरील मंडपात गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठींबा दिला. जोरदार पावसास सुरुवात होऊनही आंदोलक मैदानावर बसून आहेत. आंदोलकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. (Jarange’s hunger strike begins)