वॉशिंग्टन : इराण-इस्त्रायल यांच्यातील १२ दिवसाच्या संघर्षानंतर अचानक नाट्यमय वळण आले असून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणवर शक्तीशाली बॉम्ब फेकल्यावर इराणने अमेरिकेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी (२३ जून) रात्री इराणनने कतार आणि कुवेतमधील अमेरिकन सैन्यतळावर हल्ला केल्यानंतर काही तासातच ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केली. दरम्यान युद्धबंदीनंतरही इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दक्षिण इस्त्रायलमध्ये सातजणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (Iran-Israel ceasefire)
युद्धबंदीसाठी कतारने प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. इराणने अमेरिकन सैन्यतळावर हल्ला केल्यानंतर कतारकडे युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. कतारने अमेरिकेशी संपर्क साधला. त्यानंतर अमेरिकेने इस्त्रालयचे अध्यक्ष बेंजामन नेत्यानाहू यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रम्प यांनी इराण इस्त्रायल युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या घोषणेनंतर इराणनेही युद्धबंदीला दुजोरा देणारे वक्तव्य केले आहे. (Iran-Israel ceasefire)
युद्धबंदी चर्चेच्या काही तास आधी इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागली. दोहा आणि लुसैलमध्ये मोठ्या स्फोटाचे आवाज ऐकायला आले. अमेरिकेने इराणच्या अणुसुविधांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा बदला घेण्यासाठी हल्ले केल्याचा दावा इराणनने केले. हे हल्ले रोखले असल्याचा दावाही कतारने केला. (Iran-Israel ceasefire)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर संघर्ष संपल्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की इराण आणि इस्त्रायलने युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. या बारा दिवसाच्या युद्धाचे वर्णन त्यांनी संपूर्ण मध्य पूर्व नष्ट करु शकले असते, पण त्याऐवजी युद्ध शांततेत संपत आहे. “देव इस्त्रायलला आशीर्वाद देवो, इराणला आशीर्वाद देवो, मध्य पूर्वेला आशीर्वाद देवो, देव अमेरिकेला आशीर्वाद देवो आणि देव जगाला आशीर्वाद देवो,’’ असे टॅम्प यांनी म्हटले आहे. तणाव रोखण्यासाठी मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी कतारचे अमीर यांचे आभार मानले. इराणच्या हल्ल्यात क्षेपणास्त्र घटनेत कोणत्याही कतारी नागरिकाला दुखापत झाली नाही. (Iran-Israel ceasefire)
इराणची अहसमती
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी निवेदन प्रसिद्ध केले. कोणत्याही युद्धबंदीवर सहमती झाली नाही. “सध्या कोणत्याही युद्धबंदी आणि लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. जर इस्त्रायली राजवटीने तेहरानच्या वेळेनुसार पहाटे चार वाजेपर्यंत इराणी लोकांविरुद्धचे बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर त्यानंतर आमचा प्रतिसाद सुरू ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. युद्धबंदीच्या मुदतीपूर्वी इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. हा शेवटचा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचे इराणनने म्हटले आहे. त्यामध्ये तीन व्यक्ती ठार झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर इस्त्रायल कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Iran-Israel ceasefire)