BSE sensex over : युद्धबंदी घोषणेनंतर बाजारात उसळी

BSE sensex over

मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण इस्त्रायल युद्धबंदीची घोषणा करताच मंगळवारी भारतीय शेअर बाजारात उसळी दिसून आली. बीएसई सेन्सेक्समध्ये १००० अंकानी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समाधान पसरले आहे. सोन्याच्या दरातही प्रतितोळा तीन हजार रुपयांनी घट झाली आहे. (BSE sensex over)

सोमवारी रात्री इराणने अमेरिकेच्या युद्धतळावर हल्ला केल्यानंतर त्याचे बाजारात पडसाद कसे पडणार याची चिंता लागली होती. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणा इस्त्रायल संघर्षात युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत उधाण आले. डॉलरच्या दरात घसरण झाली आहे. वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतही घसरल्या आहेत. सकाळी भारतीय शेअर बाजारात उघडतास निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्समध्ये वाढ झाली. बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल ९०० अंकानी वाढ झाली होती. काल सोमवारी बाजार उघडल्यावर निफ्टीमध्ये ६०० अंकांनी घसरण झाली होती. बीएसई सेन्सेक्स ९१४ अंकाने वाढला असून ही वाढ १.१२ टक्के इतकी आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल १००० अंकांनी वाढ झाली आहे. निफ्टीमध्ये २६७ अंकांनी वाढ झाली आहे. (BSE sensex over)

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर घसरला असून येन आणि युरो मजबूत झाले आहेत. सोन्याचा भावही खाली आला आहे. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममध्ये तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण तीन टक्के इतकी आहे. प्रतितोळा ९६ हजार ४२२ इतका सोन्याचा दर आहे. चांदीच्या दरात ७६० रुपये इतकी घसरण झाली आहे. (BSE sensex over)

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर