जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावर उतरा;  राहुल गांधींची  पदाधिकाऱ्यांना  सूचना 

Instructions to Rahul Gandhi's office-bearers in Maharashtra

जमीर काझी : मुंबई : केंद्र सरकारच्या फसवेगिरी मुळे देशातील व राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे.  त्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन आक्रमकपणे रस्त्यावर उतरा,  अशा सूचना  लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिकमधील १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप त्यांच्या  प्रमुख मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी त्यांनी राज्यभरात आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून त्यांच्या सोबत काँग्रेस असून  या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडेल, अशी ग्वाही दिली. (Instructions to Rahul Gandhi’s office-bearers in Maharashtra)

 राहुल यांनी केंद्र व सरकारचा कारभार, भाजपा, आरएसएस यांच्या धार्मिक दोहीच्या राजकारणावर कडाडून हल्ला चढवताना त्यांचे फेक नेरेटिव्ह उलटवून लावा, जनतेच्या समस्या ,विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरा , असे सांगितले.

 राहुल गांधी यांचे सकाळी  ११ वाजण्याच्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शोभा बच्छाव, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते  सतेज पाटील, जयश्री थोरात, यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या शिबिरस्थळी राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. यावेळी  बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी उपस्थित होते. (Instructions to Rahul Gandhi’s office-bearers in Maharashtra)

या बैठकीनंतर राहुल गांधी शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला तसेच संगठन विस्तार व काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्याक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला. (Instructions to Rahul Gandhi’s office-bearers in Maharashtra)

Related posts

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

गोकुळमध्ये सतेज पर्व