लंडन : विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज असताना मोहम्म्द सराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी करत इंग्लंडचे चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजने अचूक यॉर्करवर अटकिन्सची यष्टी उखडून काढत भारताने जमान इंग्लंडवर चार धावांनी थरारक विजय मिळवला. मालिकेचा शेवट गोड करताना तेंडूलकर अँडरसन सिरिजमध्ये भारताने २-२ अशी बरोबरी साधली. पाच गडी बाद घेणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. मालिकावीर कर्णधार शुभमन गिल ला निवडण्यात आले. गिलने या मालिकेत चार शतके झळकावली. त्यामध्ये एक द्विशतक होते. (India’s thrilling win)
आज सोमवारी शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. त्यांच्याकडे चार खेळाडू होते. खेळाची सुरुवातील इंग्लंडच्या ओव्हरटनने प्रसिदध कृष्णाच्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार मारले. पण मोहम्मद सिराजने परिस्थिती उलटवली. त्याने धडाकेबाज फलंदाज जेमी स्थिमथला ध्रुव जुरेलला झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर गस अटकिन्सला झेल राहूलने टिपला. पण चेंडू जमिनीला लागल्याने सिराजची बाद करण्याची चेंडू हुकली गेली. पुढच्याच षटकात जेमी ओव्हरटनला पायचित झाला. (India’s thrilling win)
दोन खेळाडू बाद झाल्याने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीकडे लक्ष लागले होते. त्याने जोश टँगला पायचित पकडले. पण टँगने रिव्ह्यू मागितला. रिव्ह्यू टँगच्या वाचवले. पण त्यानंतर कृष्णाने टँगला क्लिन बोल्ड केले.
इंग्लंडला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. पहिल्याच दिवशी उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर ख्रिस वोक्स हात बांधून मैदानात आला आणि त्याने जिगर दाखवताना एका हाताने डावखुरा म्हणून फलंदाजी केली. वोक्सला फलंदाजी मिळू नये यासाठी अटकिन्सने फलंदाजी सुत्रे हाती घेतली. त्याने सिराजला षटकार खेचला. त्यामुळे सामना दोन्ही बाजूने झुकला होता. सिराजने एका सुरेख यॉर्कवर अटकिन्सची सुरेख यॉर्करवर यष्टी वाकवली आणि भारताने झुकलेली बाजू उलटवत सामना अवघ्या सहा धावांनी जिंकला. (India’s thrilling win)
सिराजने दुसऱ्या डावात इंग्लंडचे पाच गडी बाद केले. त्यामध्ये तीन बळी आज सकाळच्या सत्रात घेतले. सिराजने १०४ धावांत पाच गडी बाद केले तर प्रसिद्ध कृष्णाने १२६ धावात ४ गडी बाद केले. आकाश दीपने १ बळी मिळवला.
भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले होते. पण चौथ्या दिवशी जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी शतके झळकावत इंग्लंडला विजयाकडे नेण्यास सुरुवात केली. रुटला प्रसिदध कृष्णाने बाद केले तेव्हा त्याने १०५ धावा केल्या. तर हॅरी बुक आकाश दीपच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ९८ चेंडूत १११ धावांची धडाकेबाज् खेळी केली. त्यामध्ये त्याने १४ चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर शेवटच्या दिवशीने भारताने चार गडी बाद करुन थरारक विजयाची नोंद केली. (India’s thrilling win)
सामन्यातील विक्रमाच्या नोंदी अशा
एका मालिकेत सर्वाधिक ४०० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज (९)
सर्वाधिक वैयक्तिक ५० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज (५०) सर्वाधिक
वैयक्तिक शतके करणारे खेळाडू (२१)
सर्वाधिक शतकी भागीदारी जोडणारे खेळाडू (१९)
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी
२३ – जसप्रीत बुमराह, २०२१-२२
२३ – मोहम्मद सिराज, २०२५*
१९ – भुवनेश्वर कुमार, २०१४
इंग्लंडसाठी सर्वात कमी पराभवाचे अंतर (धावा)
१ विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, २०२३
३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, १९०२
६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, १८८५
६ विरुद्ध भारत, द ओव्हल, २०२५*
भारतासाठी सर्वात कमी विजय अंतर (धावा)
६ विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, २०२५*
१३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वानखेडे, २००४
२८ विरुद्ध इंग्लंड, कोलकाता, १९७२
३१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडलेड, २०१८
शुभमन गिल मालिकावीर ठरला
सामने: ५
धावा: ७५४
सरासरी: ७५.४०
शतके ४.