Raj appeals to activists : मतभेद विसरा, मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करा : राज यांचे आवाहन

Raj thackray

मुंबई : अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (४ ऑगस्ट) त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना केले. तसेच संघटनात्मक शिस्त बाळगून गटबाजीला थारा न देता एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. (Raj appeals to activists)

येथील रंगशारदा सभागृहात बंद दाराआड पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. (Raj appeals to activists)

‘‘आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकमेकांविरुद्ध द्वेष का बाळगावा?’’ असा प्रश्न राज यांनी यावेळी उपस्थितांना केला. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज यांनी अलिकडेच मराठी भाषा आंदोलनाचा विजयी मेळावा घेतला होता. त्याचा संदर्भ या वक्तव्यामागे आहे.

बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “राज ठाकरे यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली. कोणत्याही अंतर्गत संघर्षाला थारा देऊ नका. एकत्रितपणे निवडणुकीची तयारी सुरू करा. ज्या माजी पदाधिकारी, माजी उमेदवार, अगदी निष्क्रिय कार्यकर्ते असले तरी या सर्वांना पुन्हा पक्षात आणले पाहिजे, त्यांना विश्वासात घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.” (Raj appeals to activists)

नांदगावकर म्हणाले, “ मला अमका आवडत नाही आणि मी याच्यासोबत कोणासोबत काम करू शकत नाही असे म्हणू नका. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपला आहे. एखादा जुना सहकारी परत येण्यास तयार असेल तर त्यांना विश्वासात घ्या. आपण पक्षासोबत पुन्हा काम करू शकतो, हा विश्वास त्यांना द्या, असेही आम्हाला राज ठाकरे यांनी सांगितले.’’

उद्धव ठाकरे गटासोबत अद्याप चर्चा नाही

शिवसेनेसोबत (यूबीटी) संभाव्य युतीबाबत काही चर्चा झाली आहे का असे विचारले असता, नांदगावकर यांनी ठामपणे सांगितले की अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ‘‘कोणत्याही युतीबाबत अजिबात चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांनी सांगितले की कोणत्याही राजकीय युतीचा निर्णय ते स्वतःच योग्य वेळी घेतील. आजच्या बैठकीत त्याचा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यांनी परस्पर आदरावर भर दिला. पक्षातील आपले वर्तन हे आपल्या बाह्य रणनीतीइतकेच महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.’’ (Raj appeals to activists)

गटातटांत अडकू नका

राज यांनी अंतर्गत राजकारणाविरुद्ध इशारा दिला आणि निवडणुकीच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “ते म्हणाले, ‘गटात अडकू नका. नवीन नियुक्त्या स्वीकारा, एकत्र काम करा आणि वैयक्तिक द्वेष करण्यात वेळ वाया घालवू नका. या क्षणापासून, निवडणुकीची तयारी करण्यासाठी प्रत्येक मिनिट खर्च केला पाहिजे.’’

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर