नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने पाकिस्तानमध्ये घुसुन एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवाद्याचे तळ उधवस्त केले. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईची माहिती लष्कर आणि परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेचे ब्रिफिंग लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह दोन महिला सेना अधिकाऱ्यांनी केले. लेफ्टनंट सोफिया कुरेशी कोण आहेत याची माहिती घेऊया. (Sofiya Qureshi)
सोफिया कुरेशी या सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल आहे तर व्योमिका सिंह वायुदलात विंग कमांडर आहेत. सोफिया कुरेशी या मुळच्या गुजरातच्या असून त्यांचा जन्म १९८१ मध्ये बडोदा येथे झाला. बायोकेमिस्ट्रीत त्यांनी पदवी संपादन केली. सोफिया यांचे आजोबा आणि वडील सैन्यदलात धार्मिक शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. सोफिया याचा विवाह मॅकेनाइल्ड इन्फ्रेंटीमधील सेना अधिकारी मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला. समीर कुरेशी हा त्यांचा मुलगा आहे. (Sofiya Qureshi)
१९९९ लष्कराची वर्दी चढवली.
सोफिया यांनी १९९९ मध्ये लष्कराची वर्दी चढवली. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत त्यांनी खडतर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना लेफ्टनंटपदी निवड झाली. २००६ मध्ये कांगो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र शांती स्थापना मिशन मध्ये पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावली. २०१० पर्यंत त्या शांती स्थापना अभियानास जोडल्या गेल्या होत्या. पंजाब सीमेवर ‘ऑपेरशन’ पराक्रम’ मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग- इन- चिफ चे प्रशस्तीपत्र मिळाले. उत्तर पूर्व मध्ये आलेल्या महापुरात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याबर्दंदल सिग्नल ऑफिसर इन चिफ ने या प्रशस्तीपत्राने गौरवले होते. (Sofiya Qureshi)
२०१६ मध्ये सोफिया प्रकाश झोतात
२०१६ मध्ये सोफिया प्रकाश झोतात आल्या. बहुराष्ट्रीय सैन अभ्यासात भारतीय दलाचे त्याने नेतृत्व केले होते. भारतीय दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय अधिकारी होत्या. या अभ्यास वर्गाला ‘एक्सरसाइज फोर्स १८’ या नावाने ओळखले जाते. भारताने आयोजित केला सर्वात मोठा विदेशी सैन्य अभ्यास होता. या अभ्यास वर्गात भाग घेणाऱ्या १८ दलांमध्ये सोफिया कुरेशी या एकमेव महिला होत्या. भारतीय दलात ४० सदस्य होते. त्या वेळी त्या भारतीय सेनेमध्ये सिग्नल कोर अधिकारी होत्या. (Sofiya Qureshi)