नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबऱ) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत जीडीपी ५.६ टक्के होता. अमेरिकेच्या टॅरिफ आव्हान असतानाही जीडीपी वाढला आहे. २०२५-२०१६ मध्ये भारत सहा टक्क्यापेक्षा जासत दराने वाढणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. (India’s GDP increased)
सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रामध्ये अनुक्रमे ८.१ टक्के आणि ९.२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे जीडीपी आठ टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे. उत्पादन क्षेत्र ९.१ टक्के वाढ झाली आहे तर बांधकाम क्षेत्र ७.२ टक्क्याने वाढले आहे. वित्तीय, रियल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राने १०.२ टक्क्यांनी वाढ केली आहे. (India’s GDP increased)
कृषी आणि कृषीशी संबधित क्षेत्रांमध्ये ३.५ टक्के वाढ झाली असून वीज, वायू, पाणी पुरवठा आणि इतर क्षेत्रात ४.४ टक्क्यांनी वाढली आहे.
जीडीपीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की “२०२५-२०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत झालेली ८.२ टक्के जीडीपी वाढ ही खूप चांगली गोष्ट आहे. हा आमच्या विकासाला चालना देणाऱ्या धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम आहे. जीडीपीतील ही वाढ आपल्या नागरिकांच्या कठोर परिश्रम आणि धैर्याचे देखील प्रतिबिंबित करते. आमचे सरकार विविध क्षेत्रांत सुधारणा करत राहिल आणि प्रत्येक नागरिकाचे जीवन सुलभ करेल”. (India’s GDP increased)