Indian‘s death in Texas :  भारतीय उद्योजकाचा बसमध्ये खून

Indian‘s death in Texas

ऑस्टिन : अमेरिका टेक्सासमधील ऑस्टिन येथे कॅपमेट्रोल बसमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली. अक्षय गुप्ता (वय ३०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखार दीपक कंडेल (वय ३१)  या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक केली आहे. १४ मे रोजी ही घटना घडली. (Indian‘s death in Texas)

ऑस्टिन पोलिसांनी या घटनेची माहती दिली. अक्षय गुप्ता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कॅपमेट्रोल बसमधून प्रवास करत होते. त्याच्याशेजारी दीपक कंडेल बसला होता. प्रवासादरम्यान दीपक कंडेल अचानक चाकूने बेसावध असलेल्या अक्षय गुप्ता यांच्या मानेवर वार केला. बसचालकाने पोलिस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधला. आपत्कालिन मदतनिसांनी गुप्ता यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेसात वाजता त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

केएक्सएएन नेटवर्कच्या वृत्तानुसार, घटनेनंतर लगेचच पोलिसांनी कांडेलला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी हल्ल्यामागील स्पष्ट कारणे उघड केलेली नाहीत. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.  ऑस्टिन पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून दीपक कंडेलची ओळख पटवली. फुटेजमध्ये असे दिसून आले की बसने आपत्कालीन थांबा दिल्यानंतर, कंडेल शांतपणे इतर प्रवाशांसह गाडीतून बाहेर पडला आणि घटनास्थळावरून पायी निघून गेला. ऑस्टिन पोलिस विभागाच्या गस्ती अधिकाऱ्यांनी त्याला शोधून ताब्यात घेतले.”बस थांबलेल्या ठिकाणापासून एक मैलापेक्षा कमी अंतरावर कंदेल सापडला,” असे अटकेच्या शपथपत्रात म्हटले आहे.(Indian‘s death in Texas)

गुप्ता त्याच्या काकासारखा दिसत असल्याने त्याने चाकूने वार केल्याचे संशयित कांडेलने पोलिसांना सांगितले. गुप्ता यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गुप्ता यांचे एक प्रतिभावान आणि मेहनती व्यक्ती म्हणून वर्णन केले आहे. ते अलिकडच्या काळात तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या संधी शोधण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.

Related posts

सोने, चांदी नाही, चक्क एक लाख किंमतीचा ४० पोती कांदा चोरला

ब्रिक्सच्या माध्यमातून ट्रम्प यांना इशारा देण्याचा प्रयत्न

भारतीय वैज्ञानिकांनी तयार केले नवे सर्पदंशावरील प्रतिविष