27 Naxals Killed : माओवादी नेता चकमकीत ठार

27 Naxalites Killed

गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील अबुझमाड येथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले. या कारवाईत वरिष्ठ माओवादी नेते नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचा मृत्यू झाला. २०१० मधील सीआरपी जवानांवर झालेला प्राणघातक हल्ला, २०१३ मध्ये राज्य काँग्रेस नेत्याची हत्या आणि झीरम घाटी हत्याकांडात बसवराजचा सहभाग होता. अबुझमाड हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. या चकमकीत सुरक्षा यंत्रणेचा एक जवान शहीद झाला. (27 Naxals Killed)

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. यात विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षिस असलेला नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस बसवा राजू देखील असल्याची माहीत मिळाली. (27 Naxals Killed)

सुरक्षा यंत्रणांनी मंगळवारी २० मे रोजी रात्री अभियान राबवले. रात्रभर सुरू असलेल्या या अभियानात दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर, कोंडागाव जिल्ह्यातील ५०० हून अधिक डाआरजी व इतर सुरक्षा जवान सहभागी झाले होते. बुधवारी २१ मे रोजी सकाळी नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक जवानाला वीरमरण प्राप्त झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून त्यांच्या नावाची खातरजमा केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित, हत्यारे जप्त करण्यात आली. (27 Naxals Killed)

या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की “आज छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या कारवाईत आमच्या सुरक्षा दलांनी २७ क्रूर माओवाद्यांना निष्क्रीय केले. ज्यात सीपीआय माओवादीच्या चिटणीस सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असेला नंबला केशव राव उर्फ बसवराजू यांचा समावेश आहे”

अमित शहा म्हणाले, “भारताच्या नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या लढाईच्या तीन दशकामध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. आपल्या सैन्याने सरचिटणीस दर्जाच्या नेत्याला निष्क्रीय केले आहे. या मोठ्या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलाचे आणि एजन्सीचे कौतुक करतो’’.

कोण आहेत बसवराज

सुमारे ६८ वर्षांचे बसवराज हे सीपीआय (माओवादी) चे सरचिटणीस आणि त्यांच्या पॉलिटब्युरो, केंद्रीय समिती आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य होते. ते तेलंगणातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियानापेटा येथील रहिवासी होते आणि त्यांनी वारंगल येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी घेतली होती. बसवराज यांच्या डोक्यावर एनआयए आणि छत्तीसगड सरकारसह विविध राज्य सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.गंगण्णा, गगन्ना, प्रकाश, कृष्णा, विजय, बसवराजू, बीआर, उमेश, राजू, दारापू आणि नरसिंह अशा अनेक उपनामांनी ओळखले जाणारे केशव राव यांनी २०१७-१८ मध्ये गणपती यांच्याकडून सीपीआय (माओवादी) ची सूत्रे हाती घेतली होती.

Related posts

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?