Doda accident : वाहन दरीत कोसळले; सातजणांचा मृत्यू

Doda accident

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्याय भीषण अपघातात सातजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोडा जिल्ह्यातील भारत मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडल्याचे विदारक चित्र दिसत आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस पथके आणि  रुग्णवाहिका घटनास्थळी रवान झाल्या आहेत. (Doda accident)

मंगळवारी दोडा-बरठ रस्त्यावरील फोंडा परिसरात ही दुर्दैवी घडना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळला. या अपघातात सुमारे १० ते १५ जण जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Doda accident)

सुरुवातीला तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती, परंतु आता आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे आणि एक डझनहून अधिक जखमी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी जखमींना सर्वतोपरी मदत आणि वैद्यकीय मदत पुरवली जात असल्याचे सांगितले. (Doda accident)

 “दोडा शहरापासून सुमारे २० ते २५ किमी अंतरावर असलेल्या भरत गावाजवळ एका खाजगी टेम्पोच्या रस्ते अपघाताची माहिती मिळाल्यावर तत्काळ दोडाचे उपायुक्त श्री हरविंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला. अपघातात ४ जण गंभीर जखमी आहेत. सर्वतोपरी मदत आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे,” असे ते म्हणाले.

मंत्र्यांनी पुढे सांगितले की, पोलीस उपायुक्त स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मला नियमित अपडेट देत आहेत. आवश्यकतेनुसार पुढील मदत देखील केली जाईल. मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनापासून संवेदना.

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर