‘आयएमडी’ दिला थंडीत पावसाचा इशारा

IMD has issued a warning of rain during the cold season

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दोन जानेवारी ते पाच जानेवरीपर्यंत देशातील विविध भागात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ ते ७२ तास हवामान अस्थिर राहणार असून पाऊस पूर्णपणे थांबणार नाही असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशासह राज्यात थंडी लाट आली आहे. एकीकडे थंडीची लाट आली असताना मुंबईत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारीला पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातच गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आणि कुंद झाले आहे. त्यात आयएमडीने पावसाचा इशारा दिला आहे. (IMD has issued a warning of rain during the cold season)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यात थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह राज्यात मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट जावू शकते. याच काळात काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. (IMD has issued a warning of rain during the cold season)

उत्तर भारतातील उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद आणि बिजनौर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच दोन ते पाच जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. दरम्यान, आजच्या हवामान अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (IMD has issued a warning of rain during the cold season)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार