नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा आठ टक्के कमी पाऊस पडणार आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा नव्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदाज कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. जून ते सप्टेंबर म्हिन्यात जेवढा सरासरी पाऊस पडतो तेवढा यंदा पाऊस पडणार नाही. यंदा देशात ९२ टक्के पाऊस पडणार आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस पडल्यास त्याला सामान्य पाऊस मानले जाते. (IMD Forecast: 8% Less Rainfall This Year)
पावसाळ्यासाठी पोषक वातावरण तयार होत असताना प्रशांत महासागरात अल निनोची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पावसाला फटका बसू शकतो. पण उत्तर-पश्चिम आणि पूर्व, दक्षिण भारतातील काही भागात सामान्य किंवा अधिक पाऊस पडतो. दुसरीकडे मध्य भारतासह काही भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. (IMD Forecast: 8% Less Rainfall This Year)
हवामान खात्याने वर्तवलेला हा पहिला अंदाज आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज व्यक्त केला जाणार असून त्यात क्षेत्रनिहाय पावसाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. (IMD Forecast: 8% Less Rainfall This Year)