कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

Convention Center will prove to be a milestone in the development of Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी. कन्व्हेन्शन सेंटर मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार असून, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.  राजाराम तलाव येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाची पाहणी करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. 

यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी मी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. सदर निधी प्रशासनाकडे वर्ग झाला असून, कन्व्हेन्शन सेंटरच्या कामास गती प्राप्त झाली आहे. (Convention Center will prove to be a milestone in the development of Kolhapur)

या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर मध्ये सुमारे २,००० आसनक्षमतेचे सभागृह, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, १५०० आसनक्षमतेचे ॲम्फीथिएटर, कॅफेटेरिया, एक्स्झीबिशन सेंटर अशा आधुनिक सुविधा असतील. या सुविधा आय.टी.पार्क, विविध सामाजिक  संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योजक तसेच कोल्हापूरच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरतील.  या कामांना सुमारे दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, या कालावधीत कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर नगर रचनाकार एन एस पाटील आदी उपस्थित होते. (Convention Center will prove to be a milestone in the development of Kolhapur)

आमदार क्षीरसागर यांची विरुंगुळा उद्यानास भेट

पंचगंगा नदी परिसरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान निर्माण करण्यास.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  या उद्यानात नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून, या उद्यानात सुमारे ४५० भारतीय आयुर्वेदीक झाडे लावण्यात आली आहेत. हे उद्यान नागरिकांच्या आरोग्य, व्यायाम आणि विरंगुळ्याचा केंद्रबिंदू ठरत असून, शहरातील उद्यानांपैकी सर्वोत्तम उदाहरण ठरेल अशा पद्धतीने या उद्यानाच्या दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार क्षीरसागर  यांनी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटाजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता व विरंगुळा उद्यानास भेट दिली. यावेळी त्यांनी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांचा आढावा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. (Convention Center will prove to be a milestone in the development of Kolhapur)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या