Heavy rain hit Kolhapur : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस

Heavy rain hit Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी :  विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर शहरात ढगसदृश्य पाऊस पडला. जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले असून ओढ्या नाल्यातील पाणी रस्त्यांवर आल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. काही घरात पाणीही घुसले. कोल्हापूर शहराजवळील उचगाव मणेर मळा येथे शाळकरी मुलगा वाहून गेल्याची माहिती पुढे आली आहे. (Heavy rain hit Kolhapur)

गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आभाळ अंधारुन आले होते. चार वाजता ढगांचा गडगडाट सुरू झाला. सव्वा चार वाजता जोरदार पावसाच्या सुरू झाला. पावसाचा जोर इतका होता की दुपार असूनही रात्रीचा भास निर्माण झाला. ढगसदृश्य पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने रस्त्यांवर पाणी आले. दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप रस्त्यांवरील जयंती नाल्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. शाहुपुरी कुंभारगल्ली जवळील जयंती ओढ्याचे पाणी गल्लीत घुसल्याने गुडघाभर पाणी होते. राजारामपुरी जनता बाजार चौक ते शाहू मिल पोलिस चौकी गुडघाभर पाणी आल्याने वाहतूक पोलिसांनी रस्ता वाहतूकीसाठी बंद केला. (Heavy rain hit Kolhapur)

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहिती नुसार मंगेशनगरमधील काही घरात पाणी घुसले. दसरा चौकातील करवीर पंचायत समितीजवळ एक झाड पडले. देवकर पाणंद मनोरमा नगरात पाणी घुसले. कदमवाडी येथील कोपार्डेकर कॉर्नरजवळ एका कारवर झाड पडले.

सुमारे तासभर पाऊस पडल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला. ओढ्यातून वेगाने पाणी वाहत होते. नागरिकांनी टाकलेचा कचरा अडकून बसल्याने अनेक ठिकाणी चेंबर चोकअप झाल्याचे चित्र पहायला मिळाले. (Heavy rain hit Kolhapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर