Greeting to Rajarshi Shahu : रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा

Greeting to Rajarshi Shahu

कोल्हापूर : प्रतिनिधी :  रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी झोकून काम केले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची पालखी वाहतो, अशा शब्दांत गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. (Greeting to Rajarshi Shahu)

राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त  त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जेष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते. (Greeting to Rajarshi Shahu)

कोल्हापूरचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान व प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करत, त्यांच्या विचारांची व कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव अधिक उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, देशाला दिशा देणारे काम त्यांनी केले असून, त्यांच्या जन्मस्थळाबाबत अजून जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी सर्व मिळून कर्तव्याची व भूमिकेची जबाबदारी घेऊन करू. या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे. यापुढेही आम्ही सर्वजण मिळून जन्मस्थळ विकासासाठी कार्य करू. येत्या काळात अधिवेशन झाल्यावर एक बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन कामांची दिशा ठरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (Greeting to Rajarshi Shahu)

 शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मान्यवरांना व उपस्थितांना पुष्प दिले आणि शाहू महाराजांना विविध घोषणा देऊन जयंतीनिमित्त अभिवादनही केले.

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक