नाशिक : प्रतिनिधी : नाशिक सिडको परिसरात भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून फलक झळकवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. (Gopichand)
नाशिक येथील कसबा पेठ फडके हौद चौकात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता. या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार भाषण केले. भाषणात त्यांनी हिंदूत्व, धर्मांतर, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, हलाल अर्थव्यवस्था यावर आक्रमक भाष्य केले. राज्यातील मंदिरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची आणि प्रत्येक गावात धर्म दल स्थापण्याची मागणी केली. पडळकर यांचे भाषण सुरू असताना काही तरुणांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरुन झळकावले. बिश्नोई हा मोठा गँगस्टर असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Gopichand)
या संदर्भात पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे. आमदार पडळकर यांनी पोलिसांना या घटनेची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. पोलिसांना या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकावले त्यांच्यावर कारवाईहोईल, असे फडणवीस यांनी सांगितले. (Gopichand)