नाशिक : प्रतिनिधी : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतलेले अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुती आणि मंत्री गिरीष महाजन यांना टांग मारत विजय मिळवला. राज्यात १७ पैकी १६ जागा जिंकून महायुतीची घोडदौड सुरू असताना भाजप महायुतीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. निवडणुकीत महायुतीची मते मोठ्या संख्यने फुटल्याचे पहायला मिळाले. पराभवानंतर आमदार किशोर दराडे आणि उमेदवार नरेंद्र दराडे यांनी विश्वासघात झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांवर केला आहे. (Gopal Gite victorious in Nashik)
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी गेले महिनाभर महायुतीचे नेते प्रयत्न करत होते. पण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत रिंगणात कायम उमे राहण्याचा निर्णय गोकुळ गिते यांनी घेतला होता. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी गोकुळ गिते यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा गोकुळ गितेंनी जाहीर केला. त्यांनी प्रचार थांबवत असल्याचेही सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
गोपाळ गीतेंना ३५७ मते
आज सोमवारी मतमोजणीच्यावेळी मात्र वेगळे चित्र पहायला मिळाले. एकूण ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत १३ मते अवैध ठरवली. ६०५ मते वैध ठरली. वैध मतासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित केला होता. गोकुळ गितेने ३५७ मते मिळाली तर नरेंद्र दराडेंना २४८ मते मिळाली. प्रसार हिरेंना शून्य मते मिळाली. (Gopal Gite victorious in Nashik)
विधान परिषद निवडणुकीत महायुतीची घोडदौड
. महायुतीच्या निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवर अपक्ष भाजप बंडखोर उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपला ११, शिवसेनेच्या ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले.
१७ जागांचा निवडणुकीचा निकाल असा
ठाणे : रवींद्र फाटक, शिवसेना (बिनविरोध).
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना (बिनविरोध).
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी (बिनविरोध).
पुणे : विक्रम काकडे, राष्ट्रवादी (बिनविरोध).
वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर : अरुण लखाणी भाजप (बिनविरोध).
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे, भाजप (बिनविरोध).
छत्रपती संभाजीनगर जालना : सुहास शिरसाठ, भाजप.
नाशिक : गोकुळ गिते, अपक्ष.
भंडारा गोंदिया : अविनाश ब्राहमणकर, भाजप.
सांगली सातारा : धैर्यशील कदम, भाजप.
परभणी हिंगोली : सईद खान, शिवसेना.
सोलापूर : राजेंद्र राऊत, भाजप.
धारशिव, लातूर बीड : बसवराव पाटील, भाजप.