Gill double century : शुभमन गिलचे पहिलेच द्विशतक

Gill double century

बर्मिंगहॅम : शैलीदार फलंदाज शुभमन गिल याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. त्याच्या कारर्किदीतील हे त्याचे पहिले द्विशतक आहे. आज दुसऱ्या दिवशी त्याने रवींद्र जडेजा (८९) आणि वॉशिंग्टन सुंदर (४२)यांच्या साथीने विशाल धावसंख्या उभारली.  भारताने पाचशे टप्पाट ओलांडला असून  चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताने ७ बाद ५६४ धावांचा डोंगर उभारला आहे.  कर्णधार गिल २६५ तर आकाश दीप शून्य धावांवर खेळत होता. (Gill double century)

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाने इंग्लंडचा तुफानी मारा यशस्वीपणे खेळून काढला. पहिल्या तासात  ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स यांची भेदक गोलंदाजी खेळून काढली. रवींद्र जडेजाने आणखीन एक कसोटीतील अर्धशतक झळकावले. कारकीर्दीतील २३ तर इंग्लंडविरुद्ध सातवे अर्धशतक झळकावले. त्यानंतर जडेजा आणि गिलने धावफलक हालता ठेवला. बेन स्टोक्सला जडेजाने सलग दोन चौकर मारले. वेगवान गोलंदाजांची डाळ शिजली नसल्याने कर्णधार स्टोक्सने फिरकी गोलंदाज बशिरला पाचारण केले. त्याच्या चेंडूवर गिलने एक धाव घेत भारताची धावसंख्या ३५० वर नेली. (Gill double century)

त्यानंतर कर्णधार गिलने १५० धावा पूर्ण केल्या. दोघांची जोडी फोडण्यासाठी इंग्लंडने जंग जंग पछाडले पण त्यांनी दाद लागू दिली नाही. दोघांनी एकेरी, दुहेरी धावा घेत धावफलक हालता ठेवला. खराब चेंडू सीमापार करत भारताची धावसंख्या ४०० वर नेऊन पोचवली. रवींद्र जडेजा शतकाजवळ पोचला असता एका सुरेख चेंडूवर तो चकला. जोश टँगच्या गोलंदाजीवर त्याला यष्टीरक्षक जेमी स्मिथने त्याचा झेल टिपला. जडेजाने १३७ चेंडूत ८९ धावा केल्या. त्याला शतकासाठी ११ धावा कमी पडल्या. उपहारास खेळ थांबला तेव्हा भारताने ६ बाद ४१९ धावा केल्या. शुभमन गिल १६८ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर एक धावांवर खेळत होता. (Gill double century)

उपहारानंतर सामन्याची सुत्रे भारताकडे आली. गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या गोलंदाजीला यशस्वीपण तोंड दिले. शुभमन गिलेने बशिरला मिड ऑफवर षटकार खेचला. त्यावेळी तो द्विशतकापासून १३ धावांनी दूर होता. त्यानंतर गिलने सलग दोन चौकार मारले आणि द्विशतकाजवळ पोचला. तर दुसरीकडे सुंदरने इंग्लंडच्या गोलंदाजीवर तुटुन पडला. त्याने एकाच षटकात एक षटकार आणि एक चौकार मारला. त्यानंतर गिलने एक धाव घेत आपले २०० धावा करत द्विशतक पार केले. भारताचा सर्वात तरुण कर्णधार द्विशतक करणारा खेळाडू ठरला. पतौडी, सचिन तेंडूलकर, विराह कोहलीनंतर द्विशतक झळकवणारा सर्वात तरुण कर्णधार म्हणून गिलची नोंद झाली. (Gill double century)

द्विशतकानंतर कर्णधार गिल आक्रमक झाला. गिल आणि वॉशिग्टंन सुंदरने धावांची झेप पाचशेकडे नेण्यासाठी खेळ केला. पण वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा रुटने उडवला. ६८ चेंडूत त्याने ४२ धावा केल्या. त्यावेळी शुभमन गिल २६५ धावांवर खेळत होता. (Gill double century)

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय