Diogo Jota : विवाहानंतर १० दिवसात फुटबॉलपटूचा अपघाती मृत्यू

मद्रिद : लिव्हरपूल आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू डिओगो जोटा यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. स्पेनमधील झमोराजवळ आज गुरुवारी अपघात झाला. डिओगीचा भाऊ आंद्रे याचाही मृत्यू झाला. त्यांची लॅम्बोर्गिनी ए-५२ महामार्गावरुन घसरली आणि टायर फुटुन आग लागली. त्यामध्ये दोघां भावाचा मृत्यू झाला. या घटनेने जगभरातील फुटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे. (Diogo Jota)

दहा दिवसापूर्वी डिओगा जोटाचा विवाह झाला होता. आज दोघे भाऊ लॅम्बोर्गिनी स्पोर्टस् कारने प्रवास करत होते. महामार्गावरुन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि लॅम्बोर्गिनीला आग लागली. आगीच्या ज्वाला झाडांमध्ये पसरल्या होत्या. आपत्कालीन सेवा तात्काळ घटना पोहोचल्या. पण दोघां भावांना वाचवण्यात यश आले नाही.

झेमोरा वाहतूक पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. स्पेनच्या वायव्येकडील झमोरा शहराजवळील ए-५२ रस्त्यांवर हा अपघात झाला. झमोरा वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलासह स्थानिक आपत्कालिन मदतनिस घटनास्थळी पोहोचले. अपघात इतका भीषण होता की बचाव करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताही आले नाही. २८ वर्षीय डिओगा जोटा आणि त्याचा २६ वर्षीय भाऊ जागेवरच ठार झाले. (Diogo Jota)

फुटबॉलमध्ये स्टार खेळाडू म्हणून ओळख

डिओगा जोटा हा स्टार फुटबॉलपटू होता. ४४.७ दशलक्ष पौंड मानधनासह तो लिव्हरपूलमध्ये संघात खेळत होता. लिव्हरपूलमध्ये असताना त्याने १८२ सामने खेळताना त्याने ६५ गोल केले तर २६ असिस्ट केले. लिव्हरपूलच्या यशात त्याची भूमिका बजावली. लिव्हरपूलने प्रिमियर लिग, एएफ कप आणि लीग कप स्पर्धा जिंकली त्यामध्ये जोटाचा समावेश होता. फुटबॉल खेळातील त्याचा वेग, कौशल्य आणि गोल नोंदवण्याच्या अचून संधी मिळवण्यात तो माहीर होता. लिव्हरपूलच्या चाहत्यांमध्ये तो लाडका खेळाडू होता. त्यांच्या अकाली निधनाने फुटबॉल जगतात एक पोकळी निमार्ण झाली आहे. (Diogo Jota)

डिओगो जोटाची मोठी संपत्ती

सॉकर प्लेअर डिओगो जोटाने मोठे नाव कमावले होते. त्याच्या यशस्वी कारकीर्दीमुळे त्याची कमाईही मोठी होती. मृत्यूच्यावेळी त्याची संपत्ती १२ दशलक्ष ते २० दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान होती. लिव्हरपूल, अटलेटिको मद्रिद आणि वोल्व्हरहॅम्पटन वँडरर्स सारख्या अव्वल क्लबसोबतच्या करारांमधून तसेच जाहिराती आणि प्रायोजकत्वाच्या माध्यमातून संपत्ती कमावली होती. लिव्हरपूलमध्ये त्याचा आठवड्याचा पगर १४०,००० पौंड इतका होता. त्याचा वार्षिक पगार ७.३ दशलक्ष पौंड होता. जोटाचा लिव्हरपूलबरोबरचा करार २०२७ पर्यंत चालणार होता.

दहा दिवसापूर्वी झाला होता विवाह

डिओगा जाटाचा त्याची लहानपणीची मैत्रिण कार्डोसाशी विवाह झाला. २०१२ मध्ये जोटा आणि काटार्सा पोर्टोमध्ये भेटले होते. त्यावेळी दोघांचे वय १३ होते. शाळेला जाण्यासाठी बसचा लांबचा प्रवास यामुळे त्यांची जवळीक वाढली. त्याच्या प्रत्येक करारासोबत कार्डोसा होती. त्यांना दिनिस आणि डुआर्टे दोन मुले आहेत. नोव्हेंबरमध्ये मुलगीही झाली आहे. अनेक वर्षे खेळ आणि दुखापतीमुळे लग्न लांबले होते. अखेर २२ जून रोजी पोर्टोच्या बाहेर अठराव्या शतकातील एक इस्टेटमध्ये विवाह समारंभ पार पडला.  (Diogo Jota)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर