नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकपमध्ये बाद फेरीच्या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. चार वेळचा विश्वचषक विजेत्या जर्मनीला पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अशा फरकाने नमवले. तर अफ्रिकन मोरोक्को संघाने बलाढ्य नेदरलँडला ३-२ असा पराभव केला. स्पर्धेत दोन बलाढ्य संघाचा पराभव झाला असताना दुसरीकडे ब्राझिलने अतिशय चुरशीच्या लढतील अशियाई संघ जपानवर २-१ असा विजय मिळवत अंतिम सोळ्या संघामध्ये आगेकुच कायम ठेवली आहे. (Germany and the Netherlands out in penalty shootouts)
बलाढ्य जर्मनी पराभूत
मॅसॅच्युसेटस् मधील फॉक्सबरो येथील बोस्टन स्टेडियमवर चार वेळचा जगज्जेता जर्मनी आणि पॅराग्वे यांच्यातील सामना पूर्णवेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूट आऊटमध्ये पॅराग्वेने जर्मनीला ४-३ असा धक्का देत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. १२० मिनिटाला सामन्यात ७५ टक्के चेंडू जर्मनीकडे असतानाही पॅराग्वेने चिकाटीने बचाव केला.
सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला पॅराग्वेने धडाकेबाज चढाई केली. मिगल अल्मिरॉनने मारलेला कॉर्नर सुरवातील क्लिअर झाला. पण अल्मिरॉनने चपळाईने चेंडूचा ताबा घेत मॅटियास गॅलार्डकडे पास दिले. गॅलार्डने मारलेला क्रॉस ज्युलो एन्सिसोने जोरदार हेडर मारुन चेंडू जमिनीवर आदळला. पण चेंडू विचित्रपणे उसळी मारुन तो मॅन्युएल न्यूअरच्या डोक्यावर नेटमध्ये केला. पॅराग्वेला अपेक्षितपणे १-० अशी आघाडी घेतली.
मध्यतंत्तरानंतर मैदानात उतरलेलेल्या जर्मनीने ५४ व्या मिनिटाला बरोबरी साधली. हावर्टझन हेडरवर गोल केला. बरोबरीनंतर जर्मनीने वेगवान खेळ केला. त्यानंतर जर्मनीला १६ कॉर्नर किक्स मिळाल्या. पॅराग्वेने ७८ क्लिअरन्स केले.
३० मिनिटाच्या जादा वेळेतही जर्मनी संघाचे खेळावर प्रभुत्व होते. पण गोल होऊ शकला नाही.१०२ व्या मिनिटाला जोनाथन टाहने मारलेला हेडर गोलजाळ्यात गेला. पण पंचांनी व्हीएआर च्या रिप्लेनंतर हा गोल नाकारला. पेनल्टी शूटआऊटमध्ये पॅराग्वेने जर्मनीचा ४-३ असा धक्कादायक पराभव केला. (Germany and the Netherlands out in penalty shootouts)
कडव्या लढतीत मोरोक्कोचा विजय
नेदरलँड आणि मोरोक्को यांच्यातील सामना अतिशय वेगवान झाला. पूर्वार्धात सामना शून्य गोलबरोबरीत होता. उत्तरार्धात ७२ व्या मिनाटला नेदरलँडच्या कोडी गाक्पोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलनंतर गाक्पोवर खेळाडूंनी अभिनंदनाचा वर्षाव केला. पण गाक्पो भाविक झाला होता. नुकतेच न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे त्याला कळले असून तो भावूक झाला होता.
मोरोक्कोने परतफेड करण्यासाठी नेदरलँडच्या गोलक्षेत्रात चढल्या केल्या. अखेरच्या ९१ व्या मिनिटाला चेम्सडाइन ताल्बीच्या उंच क्रॉसवर इस्सा डोयोपेने हेडरवर गोल करत सामना १-१ बरोबरीत आणला. अतिरिक्त ३० मिनिटाला खेळातही गोल होऊ न शकल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. चार पेनल्टीमध्ये सामना २-२ असा बरोबरीत असताना मोरोक्कोचा गोलकिपर यासिन बोनुने डावीकडे झेप घेत क्रिसेन्सियोची पेनल्टी अडवली आणि सामन्याची दिशा बदललली. मोरोक्कोची अंतिम किक सायबारीने अचूक मारत संघाच्या विजयाची नोंद केली. गोलनंतर सायबारीने आपला टी शर्ट फाडत आनंदोत्सव साजरा केला केला. या स्पर्धेत अपेक्षापेक्षा नेदरलँडला स्पर्धेतून बाहेर जावे लागले.
ब्राझिलचा जपानवर विजय
ब्राझिलने सामन्याच्या अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल करत जपानचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला जपानने गोल करत सामन्यात आघाडी घेतली. कैशू सानो याने वेगवान फटक्याद्वारे गोल केला. उत्तरार्धात ५६ व्या मिनिटाला कॅसेमिरोने गॅब्रियल मॅगल्हेसच्या क्रॉसवर मोठी उडी मारुत जपानचा गोलरक्षक सुझुकीला चकवत हेडरद्वारे गोल करत सामना बरोबरीत आणला. सामन्याच्या ९६ व्या मिनिटाला ब्रुनो गिमारेसने जपानची बचावफळी भेदत आणि गोलरक्षकाला चकवत निर्णायक गोलची नोंद केली. (Germany and the Netherlands out in penalty shootouts)