नवी दिल्ली : लॉस एंजेलिसमध्ये घरच्या मैदानावर पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेने दणदणीत विजयाची नोंद केली. त्यांनी पॅराग्वेचा ४-१ असा पराभव केला. यजमान कॅनडा आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला. फिफा वर्ल्डकप २०२६ चे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांनी आयोजन केले आहे. (USA’s resounding victory over Paraguay)
घरच्या मैदानावर संघाच्या समर्थकांना अमेरिकन खेळाडूंनी जाम खूष केले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला अमेरिकेला आघाडी मिळाली. अमेरिकेच्या वेस्टन मॅकेनीने पेनल्टी एरियात टाकलेला चेंडू पॅराग्वेचा बचावपटू डॅमियन बोबाडिलाने चूक केल्याने चेंडू त्याच्या पायाला लागून जाळ्यात गेला आणि स्वयंगोल झाला. (USA’s resounding victory over Paraguay)
एकाच सामन्यात दोन गोल करणारा बालोगुन पहिला खेळाडू
या गोलनंतर उरुग्वे संघ दबावाखाली आली तर अमेरिकेची आघाडी आणि मधली फळी जोशात होती. ३१ व्या मिनिटाला अमेरिकेने दुसऱ्या गोलची नोंद केली. ख्रिश्चन पुलिसिकने दिलेल्या पासवर फोलारिन बालोगुनने गोल केला. त्यानंतर मध्यंत्तरास जादा वेळेत बालोगुनने वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. एकाच सामन्यात दोन गोल करणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली.मध्यंत्तरास अमेरिका संघ ३-० अस आघाडीवर होता.
मॉरिसिओने पॅराग्वेकडून पहिला गोल नोंदवला
उत्तरार्धात पिछाडी भरुन काढण्यास पेराग्वेने प्रयत्न सुरू केले. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मॉरिसिओने पॅराग्वेकडून पहिला गोल नोंदवला. पूर्णवेळेत सामन्यात ३-१ अशी आघाडीवर असताना जादा वेळेत ९८ व्या मिनिटाला जिओ रेनाने एका वेगवान फटक्यावर गोल करत अमेरिकेला घसघशीत आघाडी मिळवून दिली. अमेरिकेने हा सामना ४-१ अशा फरकाने जिंकला. (USA’s resounding victory over Paraguay)
कॅनडा. बोस्निया-हर्झेगोविना सामना बरोबरीत
कॅनडाची राजधानी टोरांटो स्टेडियमवर ब गटातील कॅनडा आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यात सलामीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. बोस्निया हर्झेगोविना संघाने अतिशय सुंदर आणि सफाईदार गोलची नोंद केली. सेड कालासिनाकने मारलेल्या कॉर्नर किकवर जोवो लुकिचने हेडरद्वारे चेंडूला जाळ्याची दिशा दाखवली. या गोलमुळे घरच्या मैदानावर कॅनडियन समर्थक शांत झाला.
गोलची परतफेड करण्यासाठी कॅनडान आक्रमक चढाया केल्या. जोनाथन डेव्हिडची गोल नोंदवण्याची संधी संतर्क गोलरक्षक निकोला वासिल्जने रोखली. टानी ओलुवासेयिने मारलेला फटका गोलपोस्टच्या वरुन गेला. मध्यंतरास बोस्निया संघ १-० असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात ओलुवासेयीने हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार स्टिफन युस्टाकिओ आणि कोलासिनाकने गोल नोंदवण्याचा सुरेख प्रयत्न केला. कॅनडाचे प्रशिक्षक जेसी मार्श यांनी अनुभवी स्ट्रायकर लॅरिनला मैदानात उतरले. सामना संपण्यास अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना ७८ व्या मिनिटाला लॅरिनने वेगवान फटक्याद्वारे गोल करत सामना १-१ बरोबरीत आणल्यानंतर कॅनडाच्या समर्थकांनी मैदानावर जल्लोष साजरा केला.