फिफा विश्वचषकाचे ड्रॉ जाहीर, मेस्सीच्या अर्जेटिनाची अल्जेरियाशी सलामी

Argentina to face Algeria in opener

नवी दिल्ली : फिफा विश्चषक २०२६ स्पर्धेचे ड्रॉ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले. लिओनिल मेस्सीचा गतविजेता अर्जेटिना संघ अल्जेरियाशी सलामीला भिडणार आहे. अर्जेटिना आणि प्रथम मानांकित स्पेनला अनकुल ड्रॉ मिळाले आहेत. एम्बापेचा फ्रान्स आणि हालांडचा नार्वे हे दोन्ही संघ एकाच गटात आल्याने या ग्रुपमधील लढती तुल्यबळ ठरणार आहेत. ११ जून २०२६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत स्पर्धा होणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश स्पर्धेचे यजमान आहेत. ४८ संघामध्ये १०४ सामने होणार आहेत.

न्ययॉर्कमधील मेटलाइफ स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सोळा लढतीपैकी बहुतांशी अमेरिकेत होणार असून तीन लढती मेक्सिकोमध्ये तर दोन लढती कॅनडामध्ये होणार आहेत. (Argentina to face Algeria in opener)

शुक्रवारी रात्री एका रंगारंग कार्यक्रमात ड्रॉ काढण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फिफाच्यावतीने ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देण्यात आला. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी ट्रम्प यांना पुरस्कार दिला. (Argentina to face Algeria in opener)

११ जून रोजी मेक्सिको सिटीमधील एस्टॅडिओ अइटेकामध्ये यजमान मेक्सिकोचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मेक्सिको, दक्षिण आफ्रिका अ गटात आहेत. क गटात ब्राझिल, मोरोक्को, स्कॉटलंड आणि हैती हे संघ आहेत. ई गटात जर्मनी, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर आणि कुराकाओ हे संघ असतली. अजुन पात्रता फेरीच्या लढती होणार असून त्यातील संघाचा ड्रॉमध्ये समावेश होणार आहे. (Argentina to face Algeria in opener)

एकूण  १२ गट:

गट अ

मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, पात्रता फेरी

गट ब

कॅनडा, पात्रता फेरी, कतार, स्वित्झर्लंड

गट क

ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड

गट ड

अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, पात्रता फेरी

गट ई

जर्मनी, कुराकाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर

गट एफ

नेदरलँड्स, जपान, पात्रता फेरी, ट्युनिशिया

गट जी

बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड

गट एच

स्पेन, केप व्हर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे

गट आय

फ्रान्स, सेनेगल, पात्रता फेरी, नॉर्वे

गट जे

अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन

गट के

पोर्तुगाल, पात्रता फेरी, उझबेकिस्तान, कोलंबिया

गट एल

इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ