सह्याद्रीच्या रक्षणासाठी पारगड ते पन्हाळा जागरण यात्रा

'Jagaran Yatra' from Pargad to Panhala

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजप महायुती सत्तेकडून जंगलात उभारण्यात येणाऱ्या पंप स्टोरेज उर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि सह्याद्रीच्या रक्षणांसाठी पारगड ते रायगड जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा  म्हणून ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर कालावधीत पारगड ते पन्हाळागड अशी यात्रा काढण्यात येणार आहे. सह्याद्री खोऱ्यात असे प्रकल्प असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही संयोजकांनी केला आहे. (‘Jagaran Yatra’ from Pargad to Panhala)

प्रा. सुनील शिंत्रे आणि कॉ.संपत देसाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भीमाशंकर तारळी पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही पाच पंप स्टोअरेज प्रकल्प उभारण्यात येणार असून दीड ते दोन हजार हेक्टर समृद्ध जंगल उद्धवस्त होणार आहे. तसेच चंदगड, आजरा आणि सिंधुदुर्ग दोडामार्ग सारख्या जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील भूमार्गावर शक्तीपीठ महामार्ग नेणार आहे. पंप स्टोअरेजसारखे प्रकल्प आणून इथले पर्यावरण आणि निसर्ग उद्धवस्त केला जाणार आहे. सरकारच्या या भांडवल धार्जिण्या आणि पर्यावरण विरोधी धोरणाच्या विराधात जनजागरण करण्यासाठी पारगड ते रायगड अशी जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. (‘Jagaran Yatra’ from Pargad to Panhala)

सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते यात्रेस प्रारंभ होणार आहे. तिथून ही यात्रा हेरेमार्गे चंदगड येथे येणार आहे. दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर रोजी ही यात्रा पेरणोली, देवकांडगाव, नवले, पाटगाव, कडगाव येथे येणार आहे. त्या ठिकाणी सभा होणार आहेत. पुढे शेळोली, मडूरहून गारगोटी येथे यात्रा येणार असून तिथेही एक सभा होणार आहे. तिसऱ्या दिवशी बुधवारी २ डिसेंबर रोजी यात्रा मुदाळतिठ्ठा, सरवडे, धामोड, आसुर्ले ते पन्हाळा येथे येईल. पन्हाळा येथे सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. पत्रकार परिषदेला कृष्णा भारतीय, अवधूत पाटील उपस्थित होते. (‘Jagaran Yatra’ from Pargad to Panhala)

Related posts

सौंदत्तीतील यल्लम्मा देवीला सर्पदोष झाल्याची अफवा;  महिलांचे भीमा नदीत स्नान

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बाजी ; उदयसिंह पाटील उंडाळकर अध्यक्ष

शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो