नीट पेपरफुटीतील मास्टरमाईंड कुलकर्णीला अटक

Mastermind Kulkarni arrested in NEET paper leak case

पुणे : प्रतिनिधी : सीबीआयने नीट पेपरफुटीतील मास्टरमाईंड रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाला अटक केली. पी.व्ही. कुलकर्णी असे संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. एनटीए च्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रकियेत संशयित प्रा. कुलकर्णी याचा सहभाग होता, अशी माहिती पुढे आली आहे. प्रश्नपत्रिका सेट तयार करणाऱ्या टीएममध्ये प्रा.पी.व्ही.कुलकर्णीचा समावेश होता.

सीबीआयने पुण्यातून कुलकर्णीला अटक केली. सीबीआयच्या माहितीनुसार कुलकर्णीकडे असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करुन एप्रिल २०२६ मध्ये शेवटच्या आठवड्यात पुण्यातील घरी विशेष कोचिंग सत्राचे आयोजन केले होते. या सत्रांना अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. या विद्यार्थ्यांकडून प्रा. कुलकर्णीने लाखो रुपये उकळले होते. कुलकर्णीने फुटलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवून दिले होत. सीबीआयने कसून चौकशी केल्यानंतर कुलकर्णीच्या हातात बेड्या ठोकल्या. कुलकर्णीने वर्गामध्ये विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न आणि अचूक उत्तरेही दिली होती अशी माहिती तपासात पुढे आली आहे.  (Mastermind Kulkarni arrested in NEET paper leak case)

या गुन्ह्यात सीबीआयने मनिषा वाघमारेंना अटक केली आहे. कोचिंग वर्गाचे आयोजन करण्यासाठी मनिषा वाघमारेंने कुलकर्णीला मदत केल्याचा आरोप आहे. कुलकर्णीच्या विशेष कोचिंग सत्रात त्याने विद्यार्थ्यांना वहीत प्रश्न लिहून घ्यायला सांगितले होते. तेच प्रश्न तीन मे रोजी झालेल्या नीटच्या परिक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे सिद्ध झाले आहेत. (Mastermind Kulkarni arrested in NEET paper leak case)

मोटेगावकरांचीही चौकशी

सीबीआयने लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची ११ तास कसून चौकशी केली आहे. नीटच्या परीक्षेसाठी तयारी करुन घेण्यासाठी मोटेगावकरांचा क्लास फेमस आहेत. कोचिंग क्लासने वितरित केलेल्या सराव परीक्षेतील प्रश्न ही नीटच्या परीक्षेत विचारलेल्या प्रत्यक्ष प्रश्नांशी जुळत आहेत. त्यामुळे सीबीआयने मोटेगावकरांची चौकशी सुरू केली आहे. (Mastermind Kulkarni arrested in NEET paper leak case)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट