Ganpati Miravnuk : गणरायाला भावपूर्ण निरोप

Ganpati Miravnuk

मुंबई : प्रतिनिधी : आरती, मंत्रोपच्चार आणि भक्तीभावाने दहा दिवस सेवा केल्यानंतर हलगीचा घुमका, ढोल ताशांच कडकडाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत लाडक्या गणरायला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यात सर्वत्र सार्वजनिक मंडळांनी जल्लोषी मिरवणुका काढण्यात आला. तरुणाईने पारंपरिक वाद्याच्या तालाबरोबर साउंड सिस्टीमवर नृत्याचा ठेका धरल्याचे चित्र पहायला मिळाले. मिरवणूक मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. (Ganpati Miravnuk)

राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाची धूम सुरू आहे. १० दिवसांच्या पाहुणाचारानंतर गणरायाला निरोप देण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून विसर्जन मिरवणूकीची कार्यकर्त्याकडून तयारी सुरू होती. शनिवारी सकाळी मानाच्या गणरायची निरोपाची आरती झाल्यावर मिरवणुकीनी बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीस सुरुवात झाली. मिरवणूका पाहण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी पहायला मिळाली.

मुंबईत सकाळी मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीतील गणपतीने मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेशगल्लीतील गणपती विसर्जनासाठी बाहेर काढल्यानंतर मुंबईतील इतर गणपती मंडपाबाहेर काढले जातात. मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांचा जोर दिसत आहे. पुण्यात शंख नाद, ढोलताशा पथकांच्या साथीने विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. पुण्यात पहिली मिरवणूक कसबा गणपतीची निघाली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींचे याच क्रमाने विसर्जन मिरवणूक सुरू झाली.नाशिकमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकींचा उत्साह दिसून आला. मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीप्रमाणे ढोल वाजवून आनंद घेतला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी फुगडी घालून आणि नृत्य करत विसर्जन मिरवणूक सहभाग घेतला. (Ganpati Miravnuk)

कोल्हापूरमध्येही विसर्जन मिरवणुकींचा थाट दिसून आला. खासबाग मैदानपासून मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीने कोल्हापूरच्या सार्वजनिक मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या यांनी तालमीच्या उत्सव मूर्तीची पालखी वाहिली. ढोलताशा, गजराजाची स्वारी मिरवणुकीत सहभागी झाली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात इतर मंडळाच्या मिरवणुका निघाल्या. लेटेस्ट तरुण मंडळाची मिरवणूक आकर्षक होती. मंडळाच्यावतीने ‘विठू माझा लेकूरवाळा आणि वारी’ अशी शोभायात्रा रस्त्यावर आणली होती. मिरवणूक मार्गावर विठू नामाचा गजर झाल्याने कोल्हापूरात पंढरीची वारी अवतरली होती. जय शिवराय मित्र मंडळाने वारकरी संताची शोभायात्रा रस्त्यांवर आणली होती. तटाकडील तालीम मंडळ, मित्र प्रेम तरुण मंडळ, छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा गजर पहायला मिळाली. रात्रीच्या मिरवणुकीसाठी उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम, सणगर तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालमीच्या साउंड सिस्टीम आणि लाईट शो ने मिरवणूक मार्ग झळाळून निघाला होता. मिरवणूक मार्गावर महानगरपालिकेसह सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी स्वागत कक्ष उभारले. (Ganpati Miravnuk)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर