एकनाथ शिंदेना रोज तीन, तीन गोळ्या घ्याव्या लागतात ; गणेश नाईक यांचा हल्लाबोल

Ganesh Naik criticizes Shinde

जमीर काझी :  मुंबई  : राज्यात व केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेना शिंदे गटात नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षात घमासान लढाई सुरु आहे. भाजपाचे जेष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्य नेस्तानाबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वस्वपणाला लावले आहे. प्रचाराचा रणधुमाळीत दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला तुझ्या बापाला रोज ३-३ गोळ्या घायला लागतात. त्याशिवाय झोप लागत नाही, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

 खासदार शिंदे यांनी नवी मुंबईत घेतलेल्या सभेत गणेश नाईक यांना डिवचले होते. ‘काहींचे वय झाले आहे त्यामुळे त्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. वयानुसार प्रॉब्लेम होत असतात अशी टीका केली होती. शिवाय एकनाथ शिंदे हे ईडीला घाबरतात. त्यावर नाईक हे काय इडीचे अधिकारी आहेत का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. (Ganesh Naik criticizes Shinde)

  त्याला गणेश नाईक सोमवारी घणसोली येथे झालेल्या प्रचार सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,’ माझे वय झाले आहे, असा आरोप केला जातो. पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास तरी चालतात का ते पाहू?,मी कितीही फिरलो तरी मला रस्त्यात चक्कर येत नाही. रात्री शांत झोप लागते. झोपण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. मात्र तुमच्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात,” असा घणाघात करीत जर मी थकलो तर राजकारणातून संन्यास घेतो, असे आव्हानही दिले आहे. (Ganesh Naik criticizes Shinde)

त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापले असून शिंदे-नाईक वादाला नवे वळण मिळाले आहे. , मंगळवारी उघडपणे प्रचाराचा अखेरचा दिवस असून नाईक यांच्या एकनाथ शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ganesh Naik criticizes Shinde)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर