Former corporator’s enter Shivsena : तीन माजी महापौरासह २० माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Former corporator’s enter Shivsena

मुंबई : प्रतिनिधी : उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन माजी महापौरांसह, एक माजी उप महापौर, दोन माजी स्थायी समिती सभापतींसह २० माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेसमधील माजी नगरसेवकांच्या मोठ्या गटाने शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेला बळ मिळणार आहे. (Former corporator’s enter Shivsena)

महानगरपालिका निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना शिंदे गटात २० माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांच्यासह माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे, माजी उप महापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी परिवहन समिती सभापती अभिजीत चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर यांनी प्रवेश केला. त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जहाँगिर पंडत, भरत लोखंडे, आनंदराव खेडकर, ईस्माईल बागवान, माजी नगरसेविका रिना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, गीता गुरव, अनुराधा खेडकर, संगीता सावंत यांनी प्रवेश केला. यावेळी माजी महापौर सुनील कदम उपस्थित होते. (Former corporator’s enter Shivsena)

मालोजीराजें समर्थकांचा प्रवेश

शारंगधर देशमुखासमवेत वीस नगरसेवक कोण याची चर्चा सुरू असताना काँग्रेसच् माजी आमदार मालोजीराजे यांच्या कट्टर समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या गटाला खिंडार पडले आहे. त्यामध्ये माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रकाश नाईनवरे, माजी उप महापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, भरत लोखंडे, जहाँगिर पंडत यांचा समावेश आहे. माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव हे माजी आमदार जयश्री जाधव यांचे दीर आहेत. (Former corporator’s enter Shivsena)

काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश

माजी नगरसेवकांसह काँग्रेस पक्षातील जिल्हा युवक काँग्रेसचे किरण पाटील, कुलदीप सावतकर, पार्थ मुंडे, अनिल इंगळे, सुजय चव्हाण, इजाज नागरकट्टी, विश्वविक्रम कांबळे, वसीम कांडेकर, अनिकेत कामत यांनी प्रवेश केला. तसेच अभिजीत खतकर, भाजपचे संजय सावंत, युवा सेनेचे रघुनंदन कावे, आदर्श खडके, कळंब्याचे सरपंच दत्ता हळदे, महेंद्र कोरडे, मुनील पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Former corporator’s enter Shivsena)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर