Fertilizers seized in Jainapur : जैनापूर परिसरात साडे अठ्ठावीस लाखांची अनधिकृत खते जप्त

Fertilizers seized in Jainapur

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून २८ लाख ४० हजार ७५० रुपये किंमतीची रासायनिक खते जप्त केली. (Fertilizers seized in Jainapur)

कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या मालकीच्या गट क्र. १६६ मधील गोडाऊनमध्ये धाड टाकल्यावर सेंचुरी अॅग्रो केमिकल्स, हडपसर, पुणे-१३ या नावाने १५ प्रकारची खतसदृश उत्पादने मोठ्या प्रमाणात साठवलेली आढळली. तपासणीवेळी उपस्थित आरोपी अनय प्रशांत घुणागे (वय २१, रा. हडपसर पुणे) याच्याकडे उत्पादन परवाना, विक्री परवाना किंवा कोणतेही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नव्हते. पटवर्धन यांच्या जागेत भाडे करार करुन अनय घुणागे विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करत होते. या प्रकरणात कृषि अधिकारी, गुण नियंत्रण, शिरोळ अनुप रासकर यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरु आहे. आनंदराव हंबर यांनी पंच म्हणून काम पाहिले. (Fertilizers seized in Jainapur)

ही कारवाई विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मस्तोळी,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे,  कृषि उपसंचालक  नामदेव परिट, तंत्र अधिकारी  प्रल्हाद साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने केली. या कारवाईत जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी राजेंद्र मानेयांच्या नेतृत्वाखाली सुशांत लव्हटे, मोहीम अधिकारी, जि.प., संभाजी शेणवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नंदकुमार मिसाळ, कृषि अधिकारी, गुण नियंत्रण, हातकलंगले व अनुप रासकर, कृषि अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक, शिरोळ यांचा सहभाग होता. (Fertilizers seized in Jainapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर