Shivaji Maharaj Trail Trek : स्त्री शक्ती दुर्लक्षित करता येणार नाही : खासदार शाहू छत्रपती

Shivaji Maharaj Trail Trek

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचे महत्त्वाचे योगदान आहे.या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असे प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती यांनी केले. येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर) या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी मुलींची आज स्वतंत्र तुकडी रवाना झाली. या तुकडीला शाहू महाराजांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. तत्पूर्वी उपस्थित एनसीसी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. (Shivaji Maharaj Trail Trek)

           ते म्हणाले, परदेशातील स्त्रियांना अलीकडे समानतेची वागणूक मिळत आहे . पण आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली ही कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग करत असताना स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करत या मोहिमेत विविध राज्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या. (Shivaji Maharaj Trail Trek)

      अंदमान -निकोबार, लक्षद्वीप, पाँडिचेरी, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थिनी या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी सोनतळी येथे राहणारे नंदकिशोर लकारे हे कोल्हापूर – विशाळगड या पदभ्रमंती मोहिमेचे ‘साईन मॉडेल’ गेली २१ वर्ष स्व:खर्चाने बनवीत आहेत.  शाहू महाराजांनी लकारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून हे साईन मॉडेल उत्तम झाल्याचे प्रशस्तीपत्र दिले. यावेळी ब्रिगेडियर आर.के.पैठणकर,कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन, फाईव्ह  महाराष्ट्र बटालियन (कोल्हापूर) कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलवडे,लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आदी उपस्थित होते. (Shivaji Maharaj Trail Trek)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर