अधिवेशनाचे  बनावट प्रवेश  पास पाच हजारात  उपलब्ध; उद्योगमंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर 

Fake entry passes for the legislative session available for ₹5,000

जमीर काझी :  मुंबई :  विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या अफवेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र महायुती सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याची पोलखोल करीत सरकारला घरचा आहेर दिला. एमआयडीसीच्या लेटरहेडची बनावट रंगीत झेरॉक्स वापर करून ५० बोगस प्रवेशपत्रे देण्यात आल्याचे त्यांनी विधान परिषदेत सांगितले. दोन ते पाच हजार रुपये घेऊन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून विधानसभेचे पासेस दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सभापती राम शिंदे यांनी याबाबत चौकशी समितीची स्थापना करून अधिवेशन संपण्यापूर्वी त्याबाबत दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे गेल्या काही अधिवेशनातही सातत्याने पैसे घेऊन विधानमंडळाचे बोगस पास दिले जात असल्याचा मुद्दा आमदारांनी केला आहे.आता वरिष्ठ  मंत्र्यांनेच हे आरोप केल्याने सरकार ‘बॅकफुट’वर आले आहे. मंत्री सामंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या एमआयडीसी विभागाचे खोट लेटरहेड वापरले. त्यावर विभागातील अधिकाऱ्यांची नावे घालून खोट्या सह्या केल्या गेल्या असून काही शिपायांनी ५० पास दिले असून त्यासाठी दोन ते पाच हजार रूपये घेतल्याची सांगत सभापतीकडे तक्रार केली. सभापती शिंदे यांनी यावर चौकशी समिती नेमून त्यात दोषी असलेल्या लोकांवर अधिवेशन संपेपर्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, याप्रकरणी एसआयडीसीच्या अहवालाअंती निर्णय घेऊ, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) पंकज भोयर यांनी सांगितले. (Fake entry passes for the legislative session available for ₹5,000)

मिटकरी यांचे ट्विट ….. विशेष म्हणजे सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन एंट्री पासेस संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे . विधानभवन परिसर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या बातम्या आल्याने विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्यानंतर देखील काही संघटनेचे कार्यकर्ते आत दिसले, दुपारी सभागृहात एका दालनात यथेच्छ जेवले, अधिवेशन काळात पूर्णवेळ पासेसही मिळवल्या व विशिष्ट प्रकारची पुस्तके विधीमंडळ परिसरात वाटली. आता प्रश्न असा की कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पासेस पुर्णपणे बंद असताना देखील काही विशिष्ट प्रचारक आत आले कसे? हे कोण यांचा शोध घेण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे . (Fake entry passes for the legislative session available for ₹5,000)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर