मुंडेंना मंत्रीमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करणार नाहीत : संजय राऊत

Fadnavis will not include Munde in the cabinet

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप करणार नाहीत, उलट ते या लोकांचा टप्प्याटप्प्याने गेम करणार असे मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्री मंडळात परततील याच मुद्द्यावर राऊत यांनी वक्तव्य केले. (Fadnavis will not include Munde in the cabinet)

राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवात साधला. आमदार मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून पक्ष आणि माणसे फोडण्यात अमित शहा पटाईत आहेत. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही, हे आता सांगता येणार नाही. पण त्यांना मंत्री पदी स्थानापन्न करणे, हे फडणवीसांसाठी सोपे नाही. ज्या पद्धतीने बीडमध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्यामध्ये मुंडे यांचे समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या, याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावे लागले होते.  मग ते कारण संपले का? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला. (Fadnavis will not include Munde in the cabinet)

वाल्मिक कराड हे तुरुंगात आहेत. अजूनही तो खटलेला संपलेला नाही. त्यामुळे अशावेळी ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते, अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करतील, असे वाटत नसल्याचे यावेळी राऊतांनी म्हटले. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एकाच पक्षातील दोन मंत्री हे भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपांमुळे गेले.  हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. शिंदे गटातील असे असंख्य मंत्री आहेत, ज्यांना बरखास्त केले पाहिजे. शिंदेंच्या लोकांकडून पैशांच्या बॅगा दाखवण्यात येत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस  त्यांचा टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते शिंदे गटावर घालतील, असा दावा राऊत यांनी केला. (Fadnavis will not include Munde in the cabinet)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला