Fadnavis call Pawar: फडणवीस यांचा पवारांना फोन…

Fadnavis call Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. फडणवीस यांचा फोन आला होता, असे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांचा फोन कशासाठी आला होता, हेही त्यांनी सांगितले आहे. (Fadnavis call Pawar)

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनाही फोन केला होता. पवार आणि ठाकरे यांना फडणवीस यांनी फोन केल्याच्या बातम्या आल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र पवार आणि खुद्द फडणवीस यांनीच त्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली.(Fadnavis call Pawar

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, “मी, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील इतर महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येत, दोन-तीन नावांवर चर्चा केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत झाले. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने, महाराष्ट्रातील मतदारांनी राज्यपालांना मतदान करावे, अशी विनंती त्यांनी केली. मी त्यांना ते शक्य नाही असे सांगितले. हे का शक्य नाही, असे कुणीतरी मला विचारले. मी कारणही स्पष्ट केले. ते आमच्या विचारांचे नाहीत त्यामुळे हे शक्य नाही.”(Fadnavis call Pawar

पवार, ठाकरेंशी बोललो : फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केल्याचे स्पष्टपणे सांगितले. “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल, जे स्वतः महराष्ट्राचे मतदार आहेत, त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ते निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील, असे सांगितले. तर शरद पवार यांनी, विरोधी पक्षाचा स्वतःचा उमेदवार असल्याने ते त्यांच्यासोबत राहणार आहेत, असे सांगितले आहे.”

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर