वाळवा : प्रतिनिधी : आगामी काळात ए.आय. (कृत्रिम बुध्दीमत्ता) मुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. ए.आय.मुळे जेवढा विकास होणार आहे तेवढेच प्रश्न निर्माण होणार आहेत. काळानुसार बदलला तरच टिकाल तरी ए.आय.चे आव्हान सर्वांनी स्विकारले पाहिजे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील यांनी केले. स्वर्गीयअरुणभैय्या नायकवडी यांच्या २१ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाच्यावतीने देणेत येणारा स्वर्गीय अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार डॉ. अनिल पाटील हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (Everyone should accept the appeal of AI)
डॉ.अनिल पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्था, रयत परिवार आणि हुतात्मा परिवार यांचा तीन पिढयाचा संबंध आहे. क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी, क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी व आता वैभव नायकवडी या परिवाराने रयत शिक्षण संस्थेला मदत केली आहे. रयत शिक्षण संस्था ही नेहमी तळागाळातील गरीब मुलांना मुळ प्रवाहात आणणेसाठी प्रयत्नशील असते. येणाऱ्या भविष्यकाळात शिक्षण क्षेत्रात खुप बदल होणार आहेत. आपली पारंपारीक शिक्षण प्रणाली येणाऱ्या आव्हानांना पेलू शकणार नाही त्यासाठी बहुविद्या शाखीय आणि कौशल्यावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठी ए.आय.ची मदत घेऊन आपणाला काळाबरोबर सिध्द करावे लागेल. (Everyone should accept the appeal of AI)
अध्यक्षस्थानावरुन बोलताना वैभव नायकवडी अरुणभैय्या नायकवडी यांच्या बरोबर केलेल्या कामकाजाच्या व त्यांच्या सानिध्यातील आठवणी सांगितल्या. हुतात्मा आणि रयत शिक्षण संस्थेचा एैतिहासिक संबंधचा इतिहास सांगितला. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचे व नागनाथअण्णांचे जिव्हाळयाचे संबंध होते. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहचवले. परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी पाठविले. नागनाथअण्णा १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सातारा जेल फोडून कर्मवीर अण्णांच्या घरी वास्तव्याला गेलेल्या आठवणीला उजाळा दिला. त्यांनी डॉ.अनिल पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. इतिहास समजून घेतला तरच आपण वर्तमानात जगू शकू, विचार व कामाचे ध्येय निश्चित करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. (Everyone should accept the appeal of AI)
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.राजा माळगी यांनी केले. डॉ.अनिल पाटील यांना द्यावयाच्या मानपत्राचे वाचन प्रा.विकास शिंदे यांनी केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठामध्ये विस्तार कार्य विभागात प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.वैष्णवी देवीदास इंगवले-देशमुख हिचा सत्कार करणेत आला. यावेळी वैष्णवी इंगवले-देशमुख, गौरव नायकवडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे, कारखान्याचे व्हॉ.चेअरमन रामचंद्र भाडळकर, कारखान्याचे संचालक व दुध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी, हुतात्मा बझारचे चेअरमन दिनकर बाबर, बाळासाहेब नायकवडी, कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, कारखान्याच्या संचालिका सौ.विशाखा कदम, हुतात्मा बझार कार्यवाहक सौ.नंदिनी नायकवडी, युवानेते विरधवल नायकवडी, कारखान्याचे आजी-माजी संचालक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील विविध संस्थाचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा व्ही बी पाटील यांनी मानले. (Everyone should accept the appeal of AI)