लबाड सरकारने राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी वदवून घेतल्या ; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav's attack on the state government

 मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केला. (Bhaskar Jadhav’s attack on the state government)

राज्यपालाच्या अभिभाषणबाबत चर्चेत भाग घेताना त्यांनी महायुती सरकारच्या गैरकारभाराचा पाढा वाचला. ते म्हणाले, नेहमी  घोषणांचा पाऊस नेहमीच पडतो पण अंमलबजावणीचा पूर्णपणे दुष्काळ असतो.   राज्यपाल महोदयांकडून सरकारने निरस असं भाषण करुन घेतले. घोषणांचा पाऊस नेहमीच पडतो पण अंमलबजावणीचा पूर्णपणे दुष्काळ असतो असेही जाधव म्हणाले.

सरकार तरुणांना फसवत आहे

२५ लाख तरुणांनी बेरोजगारीची नोंदणी केलेली आहे, हा सरकारी आकडा आहे. एका वर्षात सात पटीने वाढ झाली आहे.  तुम्ही कसले दावोसला करार करत आहात? तरुणांना फसवत आहात? असा सवाल करत आमदार जाधव यांनी सरकारवर टीका केली. बेरोजगारीचा दर वाढत आहे. ही प्रगती मानायची का?, असा सवालही त्यांनी केला. (Bhaskar Jadhav’s attack on the state government)

भास्कर जाधव म्हणाले,  टाटा, वेदांत, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प या राज्यात आलेले आणि कोणाला तरी जी हुजूर करावे लागते  म्हणून गुजरातला पाठविले. नवीन घोषणा करता, इव्हेंट करता. २०२४ मध्ये लाडका भाऊ योजनेखाली १०  लाख तरुणांना नोकरी देणार सांगितले.

एक रुपयात पीक विमा योजना बंद का केली?

२०२३ मधील भाषण माझ्याकडे आहे. ७५  हजार नोकर भरती करणार असल्याचे बोलले होते. त्याचं काय झालं? किती जणांना तुम्ही नोकऱ्या दिल्या. हे एकदा सांगा, असे आव्हान करून जाधव म्हणाले. नुसती जाहिरातीवर काही चालत नाही. मागेल त्याला सौरऊर्जा पंप त्याचा आकडा काढा. एक रुपया पीक विमाच काय झालं? ती योजना सरकारने बंद केली. का बंद केली? पण त्या एक रुपयाच्या नावाखाली १२ हजार कोटी रुपये तुम्ही मिळवले, पण शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा आले नाहीत अशी टीका जाधव यांनी केली. (Bhaskar Jadhav’s attack on the state government)

छत्रपतीच्या   स्मारकाचे काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रामध्ये उभा करणार आहोत असं सांगून अनेक वर्षे झाली. काय झालं स्मारकाचं? किती निवडणुका होऊन गेल्या, अशी विचारणा करून हे सरकार राज्य बुडवायला निघालेला आहे. महाराष्ट्राचा भ्रष्टाचारामध्ये सलग पहिला नंबर आहे असा आरोपही त्यांनी केला.

आता ईव्हीएम बाजूला पडली आता मताला पैसे दिले जात आहेत. त्याच्या पलिकडे बिनविरोध निवडणूक करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. लोकशाही टिकवली पाहिजे. आमहाला निधी देत नाही तर त्या भागाच वाटोळं करत आहे. नियतीचा खेळ आहे हा. राज्यपाल यांची तुम्ही फसवणूक केली म्हणून तुमचा निषेध आणि ते फसले म्हणुन त्यांच्या बदल खेद व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Bhaskar Jadhav’s attack on the state government)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर