मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत संसदेच्या तसेच विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजण्याचा बेत आखण्यात आला होता. चांदीच्या ताटात जेवण आले. त्याचा खर्च प्रति थाळी साडेचार हजार होता. चांदीचे ताट, चांदीच्या वाटा, चांदीच्या चमच्यांचा वापर करण्यात आला होता. वैशिष्ट्य म्हणजे अंदाज समिती पैशांची उधळपट्टी आणि काटकसरीची तजवीज करावी असे सांगणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या भोजनावर पैशांची उधळपट्टी करण्यात आली. (Estimate Committee)
मुंबईतील विधानभवानात देशातील विधिमंडळ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी मिळून ६०० जण परिषदेत सहभागी झाले होते. अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या निवासाची सोय करण्यात आली होती तर अधिकाऱ्यांचा निवास हॉटेल ट्रायडंटमध्ये होता. या परिषदेच्या समारोपनंतर सदस्यांना शाही पक्वान्नांची मेजवानी देण्यात आली. अर्थसंकल्पातील तरतुदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्यासाठी जबाबदारी असते. त्याच समितीच्या सदस्यांसाठी चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नांची मेजवाणी आयोजित केली होती. (Estimate Committee)
शाही मेजवानीत चांदीचे ताटे, वाट्या, पेले, चमचे होते. चांदीच्या ताटाचे दिवसाचे भाडेच साडेचार हजार रुपये होते. तर भोजनची किंमत चार हजार रुपये होती. भोजनामध्ये कोथंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी आणि पुरण पोळी असा मेन्यू होता. काटकसरीची शिफारस करणाऱ्या अंदाज समितीच्या अध्यक्षांसाठी हा घाट घातल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. (Estimate Committee)