बेंगळुरू : डॉक्टरने आपल्या डॉक्टर असलेल्या पत्नीचा थंड डोक्याने खून केला. त्वचारोगतज्ज्ञ असलेल्या पत्नीला डॉक्टराने भूलीच्या इंजेकशनचा डोस देऊन ठार मारल्याचे शवविच्छेदनात अहवालात स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. (Doctor murdered his wife)
३१ वर्षीय डॉ.महेंद्र रेड्डी याने पत्नी डॉ. कृतिका एम रेड्डी वय २८ यांचा खून केला. डॉ. कृतीका या शहरातील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये त्वचारोगतज्ज्ञ होत्या. डॉ.कृतिकावर यांच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने भूल देण्याच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस देऊन हत्या केल्याच आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही घटना गेल्यावर्षी एप्रिल २०२४ मध्ये घडली होती. (Doctor murdered his wife)
फॉरेन्सिक अहवालाने तपासाची दिशा बदलली
पोलिसांनी सांगितले की फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी च्या शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाच् स्वरुप पूर्णपणे बदलून टाकले आहे. सुरवातीला नैसर्गिक वाटत असलेला मृत्यू अनैसर्गिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. डॉ. महेंद्रने थंड डोक्याने पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले. (Doctor murdered his wife)
इंट्राव्हेनस एनेस्थेटिक प्रोपोफोलची जादा मात्रा
संशयित डॉ. महेंद्र हा इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सायस्नेस अँड ऑर्गन ट्रान्सप्लांट मध्ये सर्जिकल रेसिडेंट आहे. न्यायालयाने डॉ. महेंद्रला सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याची माहिती देताना शहर आयुक्त सीमांत कुमार यांनी माहिती दिली. एफएसएल अहवालात शस्त्रक्रियेसाठी काही काळांसाठी बेशुद्ध पाडण्यासाठी जे औषध इंजेक्शन दिले जाते ते इंजेक्शन कृतिकाला दिले होते. त्यामध्ये इंट्राव्हेनस एनेस्थेटिक प्रोपोफोलची जादा मात्रा दिसून आली. सुरवातीला आम्ही नैसर्गिक गुन्हा दाखल केला होता. पण कृतिकाचे वडील के.मुनी.रेड्डी यांनी त्यांच्या जावयावर कृतिकेला मारण्यासाठी भूल देण्याच्या औषधाचा अतिरेक केल्याचा आरोप करत नवीन तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
शवविच्छेदनाला डॉ. महेंद्र्चा विरोध
तपासात असे दिसून आले की गतवर्षी २४ एप्रिल रोजी कृतिकाला मराठहल्ली येथील कावेरी रुग्णालयात हलवले होती. ती व्हाईटफिल्डमधील मन्कोलाल येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर शवविच्छेदन करणे आवश्यक होते. परंतु महेंद्र आणि कावेरी रुग्णालय आणि पोलिसांना विनंती केली की कृतिकाचे शवविच्छेदन करण्यासाठी परावृत्त केले होते. पण पोलिसांनी कायद्याप्रमाणे शवविच्छेदन केले. (Doctor murdered his wife)
डॉ.कृतिका पोटविकारांनी त्रस्त
पोलिस अधिकारी रमेश बनोथ म्हणाले, डॉ. महेंद्रच्या म्हणण्यानुसार तो कृतिकावर उपचार करण्याचा प्रयत्न करत होता. ती बऱ्याचकाळापासून पोटाच्या विकारांनी त्रस्त होती. तिच्या आजारपणामुळे डॉ. महेंद्रला त्रास होता. ती पोटाच्या विकारांनी आजारी असल्याचे त्याला विवाहानंतर कळाले होते. तिच्या पालकांनी ही बाब लपवली याचा राग त्याला होता असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. (Doctor murdered his wife)