नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील दुर्घटनेनंतर हवाई वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना त्यांना महत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय शनिवारी (२१ जून) घेतला. विभागीय उपाध्यक्षासह तीन अधिकाऱ्यांचा हकालपट्टी केलेल्यांमध्ये समावेश आहे. (DGCA action)
विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंह, क्रू शेड्युलिंगची प्रमुख जबाबदारी असलेल्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्यूलिंगशी संबंधित पायल अरोरा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (DGCA action)
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वैमानिकांचे शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित त्यांची भूमिका आणि जबाबदारीपासून त्यांना मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, डीजीसीआयएने संबंधितांविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश एअर इंडियाला दिले आहेत. (DGCA action)
लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट क्रमांक AI-171 चे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच ते कोसळले. या दुर्घटनेत क्रू मेंबर्ससह २७० जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, या आदेशाची कार्यवाही केल्याची माहिती एअर इंडियाने एका निवेदनात दिली आहे.
तीन अधिकाऱ्यांवर ठेवलेले आरोप
- नियमांची पायमल्ली करून क्रू पेयरिंग करणे
- विमानोड्डाणाचा अनुभव आणि लायसेन्सिंगविषयीच्या नियमांचे उल्लंघन
- शेड्यूलिंग प्रोटोकॉलचे पालन न करणे
हेही वाचा :
राऊत यांच्याकडून ‘बोलबच्चन’ वक्तव्याचा समाचार
‘बुलडोझर जस्टिस’ विरुद्धच्या निकालाने हक्कांची पाठराखण : सरन्यायाधीश