वेलिंग्टन : डीपफेक तंत्रज्ञानाचा धोका अधोरेखित करण्यासाठी एका महिला खासदाराने धाडसी पाऊल उचलले. न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान स्वतःचा एक एआय-जनरेटेड न्यूड फोटो भर संसदेत दाखवला. लॉरा यांनी सांगितले की हा फोटो सहज उपलब्ध असलेल्या ऑनलाइन साधनांचा वापर करून पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात तयार केली गेली. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा धोका किती आहे ते पहा, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (Deepfake danger)
त्या म्हणाल्या, ‘‘ही प्रतिमा माझी एक नग्न प्रतिमा आहे, परंतु ती खरी नाही,’’. असे बनावट फोटो किती सहजतेने तयार केले जाऊ शकतात हे देखील सांगितले. हा अनुभव किती भयंकर आहे, हे त्याने सभागृहाला सांगितले. फोटो बनावट आहे तरीही मानसिक परिणाम किती खोल असू शकतात, हे त्यांनी स्पष्ट केले.
मॅकक्लूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही हा फोटो शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात, ‘‘आज संसदेत, मी स्वतःचा एआय-जनरेटेड न्यूड डीपफेक दाखवला जेणेकरून हे तयार करणे किती खरे आणि सोपे आहे हे दाखवता येईल. प्रश्न तंत्रज्ञानाची नाही, तर त्याचा कसा गैरवापर केला जात आहे, यावर विचार करून त्या दृष्टीने कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे.’’ (Deepfake danger)
खासदार मॅकक्लूर डीपफेकचा समावेश कायद्यात करण्यासाठी कायदेविषयक सुधारणांचा पाठपुरावा करत आहे. त्यांनी संसदेत सांगितले की डीपफेक वास्तविक प्रतिमांपेक्षा जास्त हानिकारक असू शकतात, कारण ते बनावट फोटो व्यक्तीची प्रतिमा मलीन करू शकतात. (Deepfake danger) मॅकक्लूर यांच्या कृतींमुळे डीपफेकच्या नैतिक आणि कायदेशीर आव्हानांवर राष्ट्रीय वादविवाद सुरू झाला आहे. त्यामुळे डिजिटल गैरवापरापासून संरक्षण करण्यासाठी अद्ययावत कायद्यांची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे.
हेही वाचा :
महुआ लग्नबंधनात
चेंगराचेंगरीची हायकोर्टाकडून दखल